…असा पराक्रम करणारा एकच ‘विराट’ कर्णधार; भारताचा सलग 10 वा विजय

पोलीसनामा ऑनलाईन टीम, 6 डिसेंबर 2020 : भारतीय संघाने दुसर्‍या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 6 गड्यांनी पराभव करून तीन सामन्याची मालिका 2-0 च्या फरकानं जिंकलीय. या विजायासह भारतीय संघाचा हा लागोपाठ दहावा विजय होता. भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वामध्ये भारतीय संघाने ही अतुलनीय कामगिरी केलीय. ऑस्ट्रेलियाला हरवून विराट कोहलीने आणखी एका विक्रमाला गवसणी घातलीय.

विराट कोहलीच्या नेतृत्वामध्ये भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड व ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 सामन्याची मालिका जिंकलीय. आतापर्यंत हा कारनामा कोणत्याही कर्णधाराला करता आला नाही. असा पराक्रम करणारा विराट कोहली पहिला आशियाई कर्णधार ठरलाय. विदेशामध्ये सर्वाधिक टी-20 जिंकण्याचा पराक्रमही विराटच्या संघाने करून दाखवला आहे.

2017-18 भारतीय संघ दक्षिण आफ्रिकाच्या दौर्‍यावर गेला होता. विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघाने टी-20 मालिका 2-1 जिंकली होती. या मालिकेमध्ये पहिले दोन सामने जिंकल्यानंतर नेतृत्व रोहित शर्माकडे सोपविले होते. 2018 मध्ये विराटच्या नेतृत्वात इंग्लंड दौर्‍यावर गेलेल्या भारतीय संघाने टी-20 मालिकेवर 2-1 नं नाव कोरलं होतं. 2019-20 मध्ये भारतीय संघ न्यूझीलंड दौर्‍यावर गेला होता. विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघाने 5-0 च्या फरकाने न्यूझीलंडचा पराभव केला होता.

तर, 2020 मध्ये भारतीय संघाने पहिल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवत तीन सामन्याची टी-20 मालिका 2-0 नं खेचून आणलीय.उर्वरित सामना जिंकून भारतीय संघ 3-0 च्या फरकाने ही मालिका जिंकण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरले आहेत. पहिला सामना भारताने 11 धावांनी तर, दुसरा सामना भारताने सहा गड्यांनी जिंकलाय.