कॅप्टन विराटच्या स्क्‍वॉडमधून ‘हिटमॅन’ गायब, ‘ते’ विचारतात मग रोहित कुठेयं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडीज विरोधात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय टी-२० च्या मालिकेसाठी अमेरिकेत पोहोचला आहे. वेस्ट इंडीज विरोधातील पहिला टी-२० सामला उद्या शनिवारी फ्लोरिडा मध्ये होणार आहे. त्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार विराटने आपल्या ट्वीटर अकाऊंटवर भारतीय संघाचा फोटो टाकला आहे. ज्याला “SQUAD” असं कॅप्शन दिले आहे. हा फोटो त्यांच्या ड्रेसिंगरुममधील आहे.

विराटने शेअर केलेल्या फोटोमध्ये विराट कोहलीसह रवींद्र जडेजा, नवदीप सैनी, खलील अहमद, श्रेयस अय्यर, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार आणि के एस राहुल हे सर्व एकत्रित दिसत आहेत. या फोटोत संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा दिसत नाहीये. त्यामुळे या फोटोवरून मात्र अनेकांनी विराटला टार्गेट करत प्रश्न करण्यास सुरुवात केली आहे. विराटने शेअर केलेल्या संघात रोहित का नाही, असा प्रश्न नेटकऱ्यांनी केला आहे.

विश्वचषक २०१९ मध्ये सेमी फाइनलमध्ये भारतीय संघ बाहेर पडला. त्यानंतर भारतीय संघात मतभेद असल्याचे बोलले जात होते. त्यानंतर विराटने संघात कोणतेही मतभेद नसल्याचे सांगितले होते. तसंच रोहित आणि माझ्यात सर्व काही चांगले असून संघात कोणतीही मतभेद नाहीत. मतभेदाबाबतचे वृत्त अफवा आहेत. तसंच संघाचे ड्रेसिंगरुममधील वातावरण खेळीमेळीचे असते. आम्ही मिळून-मिसळून राहतो, असं विराटने सांगितले होते. मात्र आता शेअर केलेल्या फोटोमध्ये रोहितच दिसत नसल्याने नेटकऱ्यांनी विराटच्या वक्तव्यावर प्रश्न विचारले आहेत.

ड्रेसिंगरूममध्ये जर सर्व काही चांगले आहे. तुमच्यात मतभेद नाही तर तुमच्या स्क्वॉडमध्ये रोहित का नाहीये, असा प्रश्न नेटकऱ्यांनी केला आहे. तसंच तुमच्यात खरंच सर्व चांगले आणि नीट आहे का, असा सवालही नेटकऱ्यांनी केला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like