हिटमॅन रोहित आणि माझ्यात सर्वकाही ‘OK’, विराट कोहलीचा ‘खुलासा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय संघ वेस्टइंडीज दौऱ्यावर जाण्यापूर्वी पत्रकार परिषद घेण्यात आली आहे. त्यात कर्णधार विराट कोहलीने रोहित शर्मा बरोबर कोणतेही मतभेद न झाल्याचे सांगून हे वृत्त फेटाळून लावले आहे. मी रोहित शर्मा आणि माझ्यात मतभेद असल्याच्या बातम्या ऐकल्या. मात्र यात काही तथ्य नाही. तसंच त्याने यावेळी इतर मुद्द्यांवरही आपले मत स्पष्ट केले.

रोहित आणि माझ्यात कोणतेही मतभेद नाहीत. संघाचे वातावरण ठीक असेल तरच संघाची कामगिरी दिसते. संघातील वातावरण चांगले आहे. जर संघातील खेळाडूंमध्ये मतभेद असते तर आम्ही जो खेळ दाखवला तो दाखवू शकलो नसतो. आंतररारष्ट्रीय क्रिकेटमध्ये संघाची खेळी महत्त्वाची असते. ड्रेसिंगरूमधील वातावरण तुम्ही पाहिलं पाहिजे. आम्ही कुलदीप यादव, महेंद्रसिंह धोनी यांच्यासारख्या सर्व खेळाडूंसोबत मजाकमस्ती करत असतो, असं विराटने सांगितलं.

तसंच रोहित आणि माझ्यातील मतभेदाच्या स्टोरी कोण आणि का रंगवत आहेत हे मला माहित नाही. त्यांना यातून काय साध्य होणार आहे, तेही समजत नाही. असं म्हणत त्यांनी पत्रकारांवर निशाणा साधला. पत्रकार आणि लोक आमच्या खासगी आयुष्यही यात ओढत आहेत, असंही त्याने सांगितलं. तसंच मला कोणता त्रास झाला तर तो माझ्या चेहऱ्यावर लगेच दिसतो. त्यामुळे माझ्यात आणि रोहितमध्ये सर्वकाही चांगले आहे.

दरम्यान, भारतीय संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर तीन प्रकारांमध्ये खेळणार आहे. ३ वन-डे, ३ टी-२० आणि २ टेस्ट असे हे सामने असणार आहेत. भारतीय संघ उद्या वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी रवाना होणार आहे.

https://twitter.com/ANI/status/1155827550700093440

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like