ICC World Cup 2019 : ICC च्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत विराट कोहली ‘अव्वल’ तर रोहित ‘या’ क्रमांकावर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत शनिवारी भारतीय संघाने श्रीलंकेवर शानदार विजय मिळवत वर्ल्डकप स्पर्धेत गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. त्याचबरोबर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी देखील आयसीसीच्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीतला आपला पहिला क्रमांक कायम राखला आहे.

नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार कर्णधार विराट कोहली याने आयसीसीच्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीतील आपले पहिले स्थान कायम राखले आहे. त्यानंतर रोहित शर्मा याने मोठी झेप घेत या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर उडी मारली आहे. या वर्ल्डकप स्पर्धेत रोहित शर्मा भन्नाट फॉर्ममध्ये आहे.

या वर्ल्डकप स्पर्धेत रोहित शर्माने आतापर्यंत ८ सामन्यात ५ शतकांच्या मदतीने ६४७ धावा केल्या आहेत. आयसीसीच्या क्रमवारीत सध्या रोहित शर्माचे ८८५ रेटिंग गुण झाले आहेत. त्याचबरोबर कर्णधार विराट कोहली याने देखील या स्पर्धेत आतापर्यंत ४४२ धावा केल्या असून त्याने या कामगिरीने त्याचे स्थान टिकवून ठेवले आहे.

विराट कोहली आणि रोहित शर्माच्या खालोखाल पाकिस्तानचा बाबर आझम हा तिसऱ्या क्रमांकावर असून त्याचे सध्या ८२७ गुण आहेत. या स्पर्धेत रोहित शर्मा सध्या भन्नाट फॉर्ममध्ये असून या स्पर्धेत त्याने ५ शतके झळकावली असून वर्ल्डकप इतिहासात एका स्पर्धेत पाच शतके झळकावणारा तो जगातील एकमेव खेळाडू ठरला आहे.

दरम्यान, सचिन तेंडुलकरचा वर्ल्डकपमध्ये सहा शतकांचा रेकॉर्ड आहे. सध्या रोहितने या विक्रमाशी बरोबरी केली असून या स्पर्धेत तो त्याचा रेकॉर्ड मोडतो की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

नियमित तोंडाची स्वच्छता ठेवल्यास अनेक आजार राहतील दूर

 तंदुरुस्त राहण्यासाठी वेळापत्रकात करा थोडासा बदल

 ‘फिट अँड फाइन’ राहण्यासाठी नियमित करा हे उपाय

 ‘ही’ पेये प्यायल्यास वजन होईल कमी, शरीराला मिळेल ऊर्जा

‘वजन’ कमी करताना घाई करू नका, हळूहळू करा कमी

 ‘हे’ नैसर्गिक उपाय केल्यास घेता येईल गाढ झोप