विराटच्या अपयशी फलंदाजीने RCB पराभूत !

दुबई: पोलिसनामा ऑनलाईन – अबुधाबीमध्ये झालेल्या आयपीएलच्या सनरायझर्स हैदराबादविरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाला (आरसीबी) सहा गड्यांनी पराभव स्वीकारावा लागला. या निकालामुळे बँगलोर संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. या अपयशासाठी केवळ कर्णधार विराट कोहलीचे फलंदाजीतील अपयश कारणीभूत आहे, असे मत माजी क्रिकेटपट्टू सुनिल गावस्कर यांनी व्यक्त केले आहे. कोहलीची इतर सामन्यातील फलंदाजीबरोबर आयपीएलमधील फलंदाजीशी तुलना करता अपयशच दिसते. हे विराटलाही माहित आहे त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या अपयशामागे असू शकते.

गावस्कर म्हणाले विराटला यंदाच्या पर्वात लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले. विराट एबी डिव्हिलियर्सच्या साथीने मोठी खेळी करतो त्यावेळी संघाची धावसंख्याही मोठी होते. कोहलीने १२१.३५ च्या स्ट्राईक रेटने १५ सामन्यांत ४५० पेक्षा अधिक धावा केल्या. त्याचा संघ अनेक लढतींमध्ये मधल्या षटकांत धावा फटकावण्यासाठी संघर्ष करीत असल्याचे चित्र दिसले.आरसीबीची गोलंदाजीची बाजूही कमकुवत होती. त्यामुळे त्यांना प्रतिस्पर्धी संघाला आव्हान देता आले नाही. गोलंदाजी नेहमीच त्यांची कमकुवत बाजू राहिली आहे.