विराट कोहलीला उच्च न्यायालयाकडून कायदेशीर नोटीस, जाणून घ्या प्रकरण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताचा कर्णधार विराट कोहलीला हाय कोर्टाकडून कायदेशीर नोटीस बाजवण्यात आल्याने, कोहली समोर अडचणी निर्माण झाली असून त्याच्या चाहत्यांसाठी ही एक धक्कादायक बाबच समोर आली आहे. आताच भारताचा ऑस्ट्रेलिया बरोबर सामना पार पडला. त्यात भारत विजयी झाला. तर आता इंग्लंडविरूद्ध ५ फेब्रुवारीपासून कसोटी सामना सुरू होत असून. या कसोटी मालिकेसाठी नियमित असणारा कर्णधार विराट कोहलीचे संघात पुनरागमन होत आहे. परंतु त्याअगोदर विराट कोहलीला केरळ उच्च न्यायालयाकडून कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे.

कर्णधार विराट कोहली हा एका ऑनलाइन रमी गेमची जाहिरात करतो. कोहली याला सदिच्छादूत (Brand ambassador) असलेल्या एका ऑनलाईन रमी गेममुळे ही नोटीस आली आहे. याचिकाकर्त्याने आपल्या याचिकेत म्हटले आहे की, कोहलीचा चाहतावर्ग मोठा असून तो अशा जाहिरातींच्या माध्यमातून तरुणांना ऑनलाइन गेमिंगसारख्या चुकीच्या मार्गाला जाण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. कोहली सोबत प्रसिद्ध दक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि अभिनेता अजू वर्गीस हे देखील याच रमी गेमची जाहिरात करतात.

तसेच तिरुअनंतपुरमच्या विनीथ नावाच्या तरुणाचे हा गेम खेळल्याने २१ लाखांचे नुकसान झाले. त्यामुळे त्याने आत्महत्या केली. साजेश नावाच्या व्यक्तीलादेखील या गेममुळे खूप मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. मी स्वतः देखील ६ लाख रुपये या गेमच्या व्यसनामुळे गमावले. इतरही अनेक लोकांना यामुळे भरपूर नुकसान होते आहे अशा बाबी नमूद करत याचिकाकर्त्याने माननीय न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करावा अशी विनंती केली होती. त्यानुसार त्यामुळे या याचिकेच्या आधारावर केरळ उच्च न्यायालयाने या तिघांनाही नोटीस बजावली आहे.