विराट गोलंदाजाला घाणेरड्या शिव्या देतो, बांगलादेशच्या खेळाडूचा आरोप

पोलिसनामा ऑनलाईन टीम – भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली अतिशय आक्रमक खेळाडू असून सुरूवातीच्या काळात आक्षेपार्ह हावभाव केल्यामुळे त्याच्यावर टीका झाली होती, पण आता मात्र तो मैदानावर जबाबदारीने वागत असल्याचे वारंवार पाहायला मिळत आहे. अशातच बांग्लादेशचा गोलंदाज अल अमिन हुसेन याने विराट मैदानावर गोलंदाजांना चारचौघात सांगू शकणार नाही अशा शिव्या देत असल्याचा आरोप केला आहे. बांगलादेशी क्रीडा वाहिनी क्रिकफ्रेन्झीशी फेसबुक लाइव्ह दरम्यान बोलताना त्याने विराटवर आरोप केले. आहे.

विराटला कर्णधारपदाचा भार त्याच्यावर आल्यापासून तणाव आला आहे.
गोलंदाजाने टाकलेल्या चेंडूवर धाव मिळवता आली नाही की तो गोलंदाजांना शिव्या देतो. गोलंदाजाबद्दल असे काही शब्द वापरतो जे शब्द आपण चारचौघात बोलूही शकणार नाही. तो शिव्या देऊन गोलंदाजाला मानसिकदृष्ट्या कमकुवत करण्याचा प्रयत्न करतो आणि गोलंदाजावर दडपण टाकण्याचा प्रयत्न करतो. मी ख्रिस गेल, रोहित शर्मा, शिखर धवन आणि इतर अनेक महान फलंदाजांपुढे गोलंदाजी केली आहे. त्यापैकी कोणीही असभ्य भाषेचा वापर करत नाही.

 

गोलंदाजाने चांगला चेंडू टाकला, तर ते त्या चेंडूचा सन्मान करतात. गोलंदाजाला शिव्या देत नाहीत. पण कोहली तसा नाहीये. तो कायम गोलंदाजाला डिवचण्याचा प्रयत्न करतो, असे हुसेनने सांगितले आहे. बांगलादेशचा दुसरा वेगवान गोलंदाज रूबेल हुसेन यानेही गेल्याच आठवड्यात कोहलीच्या मैदानावरील आक्षेपार्ह वर्तणुकीबाबत सांगितले होते. गोलंदाजाने डॉट बॉल (निर्धाव चेंडू) टाकला की कोहली त्याला डिवचतो. हल्ली त्याचे स्लेजिंग करणे काहीसे कमी झाले आहे. मात्रा, 19 वर्षाखालील संघात असताना तो खूपच शिविगाळ करत असल्याचे रूबेल हुसेनने सांगितले होते.