विराट कोहली पितो ‘एवढ्या’ रूपये लिटरचं पाणी, सोने अन् हिरे जडित घड्याळाची किंमत जाणून व्हाल ‘थक्क’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेट संघातील स्टार खेळाडू म्हणून सध्या विराट कोहलीची ओळख आहे. कोहली टीमचा कॅप्टन झाल्यापासून अधिकाधिक आक्रमक झाला आहे. आयसीसीच्या वनडे क्रमवारीमध्ये अनेक दिवसांपासून विराट कोहली अव्वल स्थानी आहे. कसोटी क्रिकेटमध्ये कोहली पहिल्या दोन क्रमांकामध्येच असतो, तर टी 20 मध्ये टॉप टेन मध्ये विराट आहे.

आज विराट कोहलीचा 31 वा वाढदिवस आहे. हा दिवस विराटने भूतानमध्ये साजरा केला आहे यावेळी त्यासोबत केवळ त्याची पत्नी अनुष्का शर्मा होती. बांग्लादेश विरुद्ध सुरु असलेल्या टी 20 मालिकेपासून विराटने सुट्टी घेऊन आराम करण्याचा निर्णय घेतला आहे. विराट कोहलीबाबत आपण काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत.

काय आहे विराटच्या फिटनेसचे कारण
विराट कोहलीनेसुद्धा वेगन बनण्याचा निर्णय घेतला होता. वेगन झालेल्या लोकांना मांसाहारच काय पण प्राण्यांशी निगडित कोणतीही गोष्ट आवडत नाही. विराटची पत्नी अनुष्का शर्मा देखील शाकाहारी आहे. नियमित व्यायाम आणि सकस आहार हे विराटच्या फिटनेसचे खास वैशिष्ट्य आहे. विराट कोहलीच्या नावावर क्रिकेटमधील अनेक रेकॉर्ड आहेत.

एवढ्या रुपये किमतीचे पाणी पितो विराट
कोहली पिण्यासाठी खूप महागडे पाणी विकत घेतो अशी अनेकदा सोशल मीडियावर चर्चा होती आणि ही बाब खरी आहे. विराट कोहली पिण्यासाठी फ्रान्सच्या इविन कंपनीचे पाणी पितो. या पाण्याचा दर 600 रुपये लीटर पासून ते 35,000 रुपये लीटर इतका आहे. फक्त विराटच नाही तर अनेक खेळाडू देखील हेच पाणी पितात. या पाण्यामुळे वजन कमी होते तसेच व्यक्ती तणावमुक्त राहते आणि हे पाणी त्वचेसाठी देखील उत्तम आहे. या पाण्याच्या एका लिटर बाटलीची किंमत 450 रुपये इतकी आहे. हे पाणी युरोपातील डोंगरांमधून काढले जाते.

ही आहे विराटच्या घड्याळाची किंमत
विराट कोहलीला घड्याळांचा देखील चांगला शौक आहे. त्यामुळे कोहलीकडे घड्याळाचे चांगले कलेक्शन देखील आहे. सत्तर लाख रुपये किमतीचे घड्याळ देखील विराट कोहली घालतो. वेस्टइंडीज वरून आल्यानंतर विराट कोहलीला विमानतळावर मीडियाने फोटो काढले वेळी यावेळी कोहलीने घातलेल्या घड्याळात सोने, नीलम आणि हिरे होते, या घड्याळाची किंमत तब्बल सत्तर लाखांपर्यंत होती.

Visit : Policenama.com

नकारात्मक विचारांमुळे वाढू शकतो चिडचिडेपणा, ‘या’ 8 गोष्टींची काळजी घ्या
सर्वात फिट अ‍ॅक्टर अक्षय कुमार कोणता व्यायाम करतो ? जाणून घ्या
स्नायूंच्या दुखण्यांपासून दूर राहण्याचे ‘हे’ 4 सोपे मार्ग, जाणून घ्या
सावधान ! वर्कआउटनंतर कधीही करु नका ‘या’ 4 गोष्टी, जाणून घ्या
हातांचे सौंदर्य वाढवतात नखे, त्यांची काळजी ‘या’ 5 प्रकारे घ्या
तारूण्यातच द्या आरोग्याकडे लक्ष…अन्यथा मध्यमव्यासह म्हातारपणी होईल त्रास