हिटमॅन रोहित आणि विराट मध्ये ‘पंगा’, कोहलीनं पत्रकार परिषद घेण्यास दिला ‘नकार’ !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय संघ १ ऑगस्टपासून वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार असून या दौऱ्यात भारतीय संघ ३ एकदिवसीय, ३ टी-२० तसेच २ कसोटी सामने खेळणार आहे. मात्र त्याआधी भारतीय कर्णधार विराट कोहली आणि रोहोत शर्मा यांच्यातील वाद शमण्याची चिन्हे दिसत नाहीत. वर्ल्डकपमधील सेमीफायनलमध्ये झालेल्या पराभवानंतर या वादाला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली होती. त्यामुळे भारतीय संघात दोन गट पडल्याची देखील मोठी चर्चा सुरु झाली होती. त्यानंतर आता विंडीज दौऱ्याआधी त्यात आणखी भर पडली आहे.
परंपरेप्रमाणे दौऱ्याआधी होणारी पत्रकार परिषद यावेळी होणार नसल्याची माहिती समोर येत आहे. विराट आणि रोहित यांच्यातील वाद हेच यामागील कारण असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पत्रकार परिषदेत रोहित शर्मा प्रकरणावर प्रश्न विचारल्या जाण्याच्या भीतीमुळेच विराट कोहली यावेळी पत्रकार परिषद घेणार नाही. आज भारतीय संघ टी-२० सामन्यांसाठी अमेरिकेला रवाना होणार असून त्याआधी हि पत्रकार परिषद होणार होती. त्यामुळे केवळ प्रशिक्षक रवी शास्त्री हेच हि पत्रकार परिषद घेणार आहेत.
शमी आणि जडेजा आहे कारण
खासगी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, रोहित आणि विराट यांच्यात दुरावा निर्माण झाला तो सेमीफायनलमध्ये. मोहम्मद शमी याने उत्तम कामगिरी केलेली असताना देखील संघाबाहेर केल्याने रोहित आणि विराट यांच्यात दुरावा आल्याचे या संस्थेने म्हटले आहे. त्याचबरोबर रवींद्र जडेजा याला देखील जास्त संधी न दिल्याने रोहित शर्माने आपली नाराजी व्यक्त केली होती.
सेमीफायनलमध्ये जडेजाने केलेल्या उत्तम फलंदाजीमुळेच भारताला मानहाणिहारक पराभव थोडक्यात टाळता आला. त्याचबरोबर आणखी देखील अनेक मुद्दे देखील या दुरीला असल्याचे या संस्थेने म्हटले आहे.
दरम्यान, कर्णधार विराट हा विंडीज दौऱ्यातून विश्रांती घेणार होता. मात्र कर्णधारपदाची टांगती तलवार डोक्यावर असल्याने त्याने या दौऱ्यावर जाण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
- व्यर्थ मानले जाणारे ‘हे’ रोप, स्त्री-पुरुषांच्या ‘या’ समस्यांवर रामबाण औषध
- महिलांच्या ‘मासिक’ चक्रासह कामेच्छाही ‘प्रभावित’ करतो ‘हा’ आजार, जाणून घ्या
- कॅन्सरपासून स्वत:ला दूर ठेवण्यासाठी लक्षात ठेवा ‘या’ ७ गोष्टी, जाणून घ्या
- ‘कफ’, ‘पित्त’ आणि ‘वात’ का वाढतो ? कसे टाळावे, जाणून घ्या उपाय
- मक्याचे कणीस खाण्याच्या खास पद्धती, ‘हे’ फायदे होतील, जाणून घ्या
- डोकेदुखीमध्ये करू शकता ‘हे’ ७ घरगुती उपाय, त्वरित मिळेल आराम
- ‘या’ धातूच्या भांड्यातील पदार्थ खाणे आरोग्यासाठी घातक; जाणून घ्या