विराट कोहलीने ‘या’ खेळाडूला घोषीत केले टेस्ट सीरीजचा ‘हिरो’; म्हणाला – ‘तो आमचा बेस्ट परफॉर्मर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विराट कोहलीने टेस्ट कर्णधार म्हणून भारताच्या जमीनीवर लागोपाठ 10 टेस्ट सीरीज जिंकण्याची कमाल केली आणि त्याने महेंद्र सिंह धोनीचा रेकॉर्ड मोडला. ज्याने यापूर्वी भारतात लागोपाठ कर्णधार म्हणून 9 टेस्ट सीरीजमध्ये विजय नोंदवला होता. विराट कोहलीने चार मॅचच्या टेस्ट सीरीजमध्ये इंग्लंडला 3-1 ने पराभूत करून हे ऐतिहासिक यश आपल्या नावावर केले. या विराट विजयानंतर कोहली टीमच्या कामगिरीवर खुप खुश दिसला.

इंग्लंडच्या विरूद्ध मिळालेल्या विजयानंतर टीम इंडिया दिमाखात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये सुद्धा पोहचली. चौथ्या टेस्ट मॅचमध्ये डाव आणि 25 धावांनी मिळालेल्या विजयानंतर विराट कोहलीने म्हटले की, पहिल्या टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडने आम्हाला चेन्नईत प्रत्येक बाबतीत मात दिली, परंतु यानंतर दुसर्‍या टेस्ट मॅच मध्ये चेन्नईतच आम्ही ज्याप्रकारे खेळ केला त्यामुळे जास्त आनंद झाला.

पहिल्या टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडने आम्हाला पराभूत केले कारण यामध्ये टॉसने महत्वाची भूमिका निभावली आणि आमचे गोलंदाज पूर्णपणे फॉर्ममध्ये नव्हते. यानंतर आम्ही जास्त जोर लावून गोलंदाजी आणि फिल्डिंग केली आणि सीरीजमध्ये परतलो आणि हे मनाला आनंद देणारे होते.

विराट कोहलीने टीमच्या बेंच स्ट्रेंथचे खुप कौतूक केले आणि म्हटले की, आमची बेंच स्ट्रेंथ बेहद मजबूत आहे आणि ही भारतीय क्रिकेटसाठी खुप चांगली गोष्ट आहे. चांगली गोष्ट ही आहे की, टीममध्ये जेव्हा काही बदल होतो तेव्हा कामगिरीत कोणतीही घसरण होत नाही. चौथ्या सामन्यात रिषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदरची भागीदारी आणि त्यांचा डावाने भारतीय डावाला सांभाळले.

विराटने म्हटले की, पहिल्या मॅचमध्ये मिळालेल्या पराभवानंतर आम्हाला आमच्या शारीरीक भाषेत सुधारणा करण्याची आवश्यकता होती आणि आम्ही ते केले. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये प्रत्येक टीम मजबूत आहे आणि त्यांना पराभूत करण्यासाठी मोठी मेहनत करावी लागते, जरी तुम्ही तुमच्या मातीत खेळत असाल तरी सुद्धा.

रोहितचे कौतूक करत विराटने म्हटले की, चेन्नईत त्याचा डाव निर्णायक होता, तर आर. अश्विन मागील अनेक वर्षापासून टीमचा सर्वात विश्वासू खेळाडू आहे आणि तो या टेस्ट सीरीजमध्ये सुद्धा आमचा सर्वात बेस्ट खेळाडू होता. आर. अश्विनने या टेस्ट सीरीजमध्ये एकुण 32 विकेट घेतल्या आणि तो प्लेयर ऑफ द सीरीज सुद्धा निवडला गेला.