कमाईच्या बाबतीत विराटनं टाकलं ‘या’ दिग्गजाला मागं, ‘एवढं’ आहे वार्षिक उत्पन्न

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका मॅगझिनने 2019 वर्षातील टॉप 100 श्रीमंत सेलिब्रिटीची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. विराटची वार्षिक कमाई 252.72 कोटी रुपये आहे. वार्षीक कमाईनुसार आणि प्रिंट मीडियामध्ये असलेल्या प्रसिद्धी नुसार 100 जणांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

विराट कोहली पाठोपाठ अभिनेता अक्षय कुमार दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचे वार्षिक उत्पन्न 293.25 कोटी रुपये आहे. 229.25 कोटी रुपयांसह सलमान खान तिसऱ्या क्रमांकावर आहे तर अमिताभ बच्चन 239.25 कोटी रुपयांसह चवथ्या क्रमांकावर आहे. तर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी 135.93 कोटी रुपयांसह पाचव्या क्रमांकावर आहे. तर शाहरुख खान 124.38 कोटी रुपयांसह सहाव्या आणि रणवीर सिंह 118.2 कोटी रुपयांसह सातव्या क्रमांकावर आहे.

तसेच या वर्षीच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिलांच्या टॉप 10 यादीत आलीय भट्ट आणि दीपिका पादुकोण यांचे नाव देखील आहे. आलीय भट्ट 59.21 कोटी रुपयांच्या कमाईसह आठव्या स्थानावर तर दीपिका पादुकोण 48 कोटी रुपयांच्या कमाईसह 10 व्या क्रमांकावर आहे.

अशी आहे टॉप 10 सेलिब्रिटी लिस्ट-

विराट कोहली- 252.72 कोटी रुपये
अक्षय कुमार- 293.25 कोटी रुपये
सलमान खान- 229.25 कोटी रुपये
अमिताभ बच्चन- 239.25 कोटी रुपये
महेन्द्र सिंह धोनी- 135.93 कोटी रुपये
शाहरुख खान- 124.38 कोटी रुपये
रणवीर सिंह- 118.2 कोटी रुपये
आलिया भट्ट- 59.21 कोटी रुपये
सचिन तेंडुलकर – 76.96 कोटी रुपये
दीपिका पादुकोण- 48 कोटी रुपये

फेसबुक पेज लाईक करा –  https://www.facebook.com/policenama/