विव रिचर्ड्सच्या समोर ‘अँकर’ बनला किंग कोहली, विचारले – ‘एवढे महान बॅट्समन कसे बनलात’ (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा विंडीजचा माजी खेळाडू विवियन रिचर्ड्सची नेहमी प्रशंसा करत असतो. मात्र आता शेवटी त्याला या विद्वान खेळाडूची मुलाखत घेण्याची संधी मिळाली. बीसीसीआय डॉट टीवी साठी त्याने विवियन रिचर्ड्सची मुलाखत घेतली. 30 वर्षीय विराटने त्याच्या मनात मागील काही वर्षांपासून चालत आलेले प्रश्न विचारले.

त्याचवेळी विवियन रिचर्ड्स यांनी देखील त्याच्या प्रश्नांना मनमोकळपणाने उत्तरे दिली. फलंदाजीसाठी मैदानात उतरताना तुमच्या मनात काय प्रश्न असतं त्याचबरोबर विना गार्ड्सचं खेळताना तुम्ही वेगवान गोलंदाजांचा सामना कसा केला ? अशा प्रकारचे प्रश त्याने विवियन रिचर्ड्स यांना विचारले. विवियन रिचर्ड्स हे 1991 मध्ये क्रिकेटमधून निवृत्त झाले. त्यांनी आपल्या कारकिर्दीत कसोटी सामन्यांत 8540 तर एकदिवसीय सामन्यांत 6721 धावा केल्या आहेत. त्यावेळी विराट कोहली याने आपल्या मनातील अनेक प्रश्नांचा भडीमार त्यांच्यावर केला.

या मुलाखतीमधील काही भाग पुढीलप्रमाणे
१) प्रश्न
ज्यावेळी तुम्ही खेळत होतात त्यावेळी कोणत्या समस्या होत्या तसेच स्वतःवर विश्वास कशाप्रकारे ठेवत असत
उत्तर-
मी स्वतःला नेहमी उत्तम खेळाडू समजले त्याचबरोबर मी प्रतिस्पर्धी संघाचा सामना करताना किंवा गोलंदाजांचा सामना करताना कधीही घाबरलो नाही. त्याचबरोबर मला तुझ्यात देखील माझ्यासारखे गुण दिसत असून ऍटिट्यूड देखील तसाच आहे.

२) प्रश्न
मी नेहमी तुम्हाला विना हेल्मेटचे खेळताना पहिले आहे. तुम्हाला स्वतःवर इतका विश्वास होता का ?

उत्तर-
आमच्या काळात आतासारख्या खेळपट्ट्या तयार होत नसत त्यामुळे आम्ही फलंदाजीसाठी जाताच गोलंदाजांवर तुटून पडायचो. त्यामुळे कधीही खेळताना भीती वाटली नाही.

आरोग्यविषयक वृत्त –