Virat Kohli | विराट कोहलीची मोठ्या विश्वविक्रमाला गवसणी, क्रिकेट विश्वात अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू

ॲडलेड : वृत्तसंस्था – टी-20 विश्वचषक (T-20 World Cup) स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये आज इंग्लंड विरुद्ध भारत (England vs India) सामना सुरु आहे. या सामन्यात विराट कोहलीने (Virat Kohli) एका मोठ्या विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. आतापर्यंत क्रिकट विश्वात कोणत्याही खेळाडूला अशी कामगिरी करता आलेली नाही. विराट कोहलीने (Virat Kohli) टी-20 क्रिकेटमध्ये चार हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोहलीने हा विक्रम केला आहे.

विराट कोहलीने (Virat Kohli) पाकिस्तान (Pakistan) विरुद्ध 82, नेदरलँड्स विरुद्ध (Netherlands) 62, बांगलादेशविरुद्ध (Bangladesh) 64 तर झिम्बाब्वेविरुद्ध (Zimbabwe) 26 धावा केल्या. 5 पैकी 3 डावात तो नाबाद राहिला आहे. टी-20 वर्ल्डकपमध्ये विराट कोहलीने सर्वाधिक 246 धावा केल्या आहेत. इंग्लंडविरुद्धच्या आजच्या सामन्यातही त्याने दमदार फलंदाजी केली आहे. त्याने भारताचा डाव सावरताना विश्वविक्रम रचला.

विराट कोहली या विश्वचषकात चांगल्या फॉर्मात आहे. त्यामुळे आता कोहली या विश्वचषकात नेमक्या किती धावा
करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. कोहली हा भारतासाठी मॅचविनर ठरला असल्याचे पाहायला मिळत आहे.
त्यामुळे आजच्या सामन्यात तो किती धावा करतो आणि भारतीय संघ (Indian Team) फायनलमध्ये जातो का,
याकडे संपूर्ण भारतीयांचे लक्ष लागले आहे.

विराट कोहलीने 114 सामन्यातील 106 डावात 52.77 च्या सरासरीने आणि 138.15 च्या स्ट्राईक रेटने
3,958 धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो
सध्या अव्वल स्थानी आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील लढत एडिलेवर होत आहे.
हे मैदान विराट साठी लकी आहे. या मैदानावर त्याने 75.58 च्या सरासरीने धावा केल्या आहेत.
त्याने याच मैदानावर कसोटीमधील पहिले शतक केले होते. तसेच दोन टी-20 सामन्यात तो नाबाद राहिला होता.

Web Title :-  Virat Kohli | virat kohli created a world record no player in the world of cricket could achieve such an achievement

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update