Virat Kohli | जयवर्धनेचा विक्रम मोडण्यासाठी विराट सज्ज; 89 धावा करताच बनणार टी-20 चा ’किंग’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विराट कोहली (Virat Kohli) टी-20 विश्वचषकातील (T-20 World Cup) विश्वविक्रम मोडण्यापासून अवघ्या 89 धावा दूर आहे. टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात एकमेव श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू महेला जयवर्धनेने (Mahela Jayawardene) एक हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. तर, विराट कोहलीच्या (Virat Kohli) नावावर सध्या 927 धावांची नोंद आहे. महेला जयवर्धनेचा विक्रम (World Record) मोडण्यासाठी विराट सज्ज आहे.

श्रीलंकेचा (Sri Lanka) माजी क्रिकेटपटू महेला जयवर्धनेने टी-20 विश्वचषकाच्या 31 डावात 1 हजार 16 धावा केल्या आहेत. त्यानंतर वेस्ट इंडिजचा (West Indies) तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेल (Chris Gayle) दुसर्‍या क्रमांकावर आहे. त्याने टी- 20 विश्वचषकातील 31 डावात 965 धावा केल्या आहेत. तर, 927 धावांसह विराट कोहली (Virat Kohli) तिसर्‍या क्रमांकावर आहे. त्याने टी-20 विश्वचषकाच्या अवघ्या 20 डावात इतक्या धावा केल्या आहेत. विराट कोहली सध्या महेला जयवर्धने पेक्षा 89 धावांनी आणि ख्रिस गेलपेक्षा 38 धावांनी मागे आहे.

विराटने नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात 1000 धावांचा टप्पा ओलांडला तर तो टी-20 विश्वचषकात सर्वात कमी
डावात अशी कामगिरी करणारा पहिला फलंदाज ठरेल. टी-20 विश्वचषकात विराटने 131.48 च्या स्ट्राईक रेट आणि
84.27 च्या सरासरीनं 927 धावा केल्या आहेत.

टी-20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारे भारतीय खेळाडू –

क्रमांक नाव                                                           धावा
1. विराट कोहली (Virat Kohli)                                – 927
2. रोहित शर्मा (Rohit Sharma)                              –  851
3. युवराज सिंह  (Yuvraj Singh)                             – 593
4. महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni)             – 529

Web Title :-  Virat Kohli | virat kohli have chances to break mahela jayawardene s record for most runs in t20 world cup history

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Deepak Kesarkar| शालेय विद्यार्थ्यांना पुस्तकांसोबत वह्या देखील मोफत मिळणार, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांची मोठी घोषणा

Ayurvedic Remedies For Black Hair | केस काळे करण्यासाठी उपाय : केस पांढरे झाले आहेत का, मग अवलंबा ‘हे’ 4 आयुर्वेदिक उपाय