Virat Kohli | विराट कोहली न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत रिकी पाँटिंग आणि वीरेंद्र सेहवागचा ‘तो’ रेकॉर्ड मोडणार?

पोलीसनामा ऑनलाईन : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. विराट कोहलीने नुकत्याच पार पडलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या सिरीजमध्ये पहिल्या आणि तिसऱ्या सामन्यात शतक झळकावत नवीन वर्षाची दमदार सुरुवात केली आहे. त्यानं पहिल्या सामन्यात 113 धावा केल्या होत्या. तर तिसऱ्या सामन्यात नाबाद 166 धावा केल्या होत्या. या शतकांबरोबर त्याने अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले. कोहलीनं (Virat Kohli) घरच्या मैदानावर 21 एकदिवसीय शतकं झळकावून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा 20 शतकांचा विक्रम मोडला. तसेच कोहलीनं एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक 10 एकदिवसीय सामन्यात शतकं ठोकण्याचा सचिन तेंडुलकर यांचा विक्रम मोडीत काढला.

रिकी पाँटिंग आणि वीरेंद्र सेहवागचा रेकॉर्ड रडारवर ?

भारत होमग्राउंडवर न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकेत विराट कोहली अनेक मोठे रेकॉर्ड तोडण्याची शक्यता आहे. सध्या विराट कोहलीच्या रडारवर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग आणि भारताचा माजी दिग्गज वीरेंद्र सेहवाग यांचा विक्रम आहे. त्यांमुळे विराट कोहली तो रेकॉर्ड मोडण्यात यशस्वी होतो का ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

काय आहे रिकी पाँटिंग आणि वीरेंद्र सेहवागचा रेकॉर्ड?

न्यूझीलंड संघाविरुद्ध सर्वाधिक एकदिवसीय शतकं झळकावण्याच्या बाबतीत पाँटिंग आणि सेहवाग हे दोघे अव्वलस्थानी आहेत. दोघांनी आतापर्यंत 6-6 शतकं झळकावली आहेत. तर विराट कोहली (Virat Kohli) 5 शतकांसह सचिन आणि श्रीलंकेचा माजी दिग्गज सनथ जयसूर्या यांच्यासोबत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे जर विराट कोहलीने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत दोन शतकं झळकावली तर पाँटिंग आणि सेहवागचा विक्रम मोडू शकतो.

न्यूझीलंड विरुद्ध सर्वाधिक एकदिवसीय शतकं

रिकी पॉटिंग (ऑस्ट्रेलिया) : 51 वनडे सामन्यांमध्ये 6 शतकं
विरेंद्र सहवाग (टीम इंडिया) : 23 वनडे सामन्यांमध्ये 6 शतकं
सनथ जयसूर्या (श्रीलंका) : 47 वनडे सामन्यांमध्ये 5 शतकं
विराट कोहली (टीम इंडिया) : 26 वनडे सामन्यांमध्ये 5 शतकं
सचिन तेंडुलकर (टीम इंडिया) : 42 वनडे सामन्यांमध्ये 5 शतकं

भारत-न्यूझीलंड वनडे मालिकेचे वेळापत्रक

टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेला 18 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे.
या मालिकेतील पहिला सामना 18 जानेवारीला हैदराबादमध्ये होणार आहे.
तर दुसरा एकदिवसीय सामना 21 जानेवारीला रायपूरमध्ये आणि तिसरा सामना 24 जानेवारीला
इंदूरमध्ये खेळण्यात येणार आहे. हे सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरु होणार आहेत.

Web Title :- Virat Kohli | virat kohli india vs new zealand kohli targets sachin tendulkar ricky ponting virender sehwag record in odi series ind vs nz match team india

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rakhi Sawant | अखेर आदिलने पोस्ट शेअर करत राखीबरोबर लग्नाचा केला खुलासा; म्हणाला ‘मी राखीशी लग्न केले नाही असे…’

MP Sanjay Raut | ‘यापुढे आम्ही आमच्या भूमीका ठरवू’, संजय राऊतांचा मित्रपक्षांना सूचक इशारा

Marathwada Teacher Constituency Election | मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसला बंडखोरीचा फटका; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याने केली बंडखोरी