Virat Kohli | विराट कोहलीने टी-20 विश्वचषकात रचला इतिहास; ‘युनिव्हर्स बॉस’ ख्रिस गेलचा मोडला ‘तो’ रेकॉर्ड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी टी-20 विश्वचषक 2022च्या (ICC T-20 World Cup) स्पर्धेतील भारताचा दुसरा सामना हा नेदरलँड्सविरुद्ध (Netherlands) झाला. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर (Sydney Cricket Ground) खेळण्यात आलेल्या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मानं (Rohit Sharma) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतानं निर्धारित 20 षटकात दोन विकेट्स गमावून 179 धावा केल्या. पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) सामन्यात विजयाचा शिल्पकार ठरलेल्या विराट कोहलीनं (Virat Kohli) नेदरलँड्सविरुद्धही आक्रमक फलंदाजी करत नाबाद अर्धशतकी खेळी केली. या कामगिरीसह विराटनं (Virat Kohli) वेस्ट इंडीजचा (West Indies) तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेलचा (Chris Gayle) विश्वविक्रम मोडला आहे.

टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाच्या यादीत विराट कोहलीने (Virat Kohli) दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात एकमेव श्रीलंकेचा (Sri Lanka) माजी क्रिकेटपटू महेला जयवर्धनेनं (Mahela Jayavardhane) एक हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. जयवर्धनेनं टी-20 विश्वचषकाच्या 31 डावात 1 हजार 16 धावा केल्या आहेत. तर, विराट कोहलीच्या नावावर सध्या 989  धावांची नोंद आहे.

या यादीत ख्रिस गेल दुसऱ्या क्रमांकावर होता. त्यानं टी- 20 विश्वचषकातील 31 डावात 965 धावा केल्या आहेत.
नेदरलँड्स विरुद्ध सामन्यापूर्वी विराट 927 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर होता.
विराट कोहलीला ख्रिस गेलला मागे टाकण्यासाठी अवघ्या 38 धावांची गरज होती.
त्याने नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात 62 धावांची खेळी करत ख्रिस गेलचा विक्रम मोडला.

टी-20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारे भारतीय-

1. विराट कोहली – 989 धावा
2. रोहित शर्मा (Rohit Sharma) – 904 धावा
3. युवराज सिंह (Yuvraj Singh) – 593 धावा
4. महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) – 529 धावा

Web Title :- Virat Kohli | virat kohli record 2nd highest run scorer t20 world cup history goes past chris gayle after scoring 62 runs ind vs ned t20 wc

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kishori Pednekar | किशोरी पेडणेकर यांना राज ठाकरेंचे नाव घेतल्याशिवाय राहवत नाही, मनसेचा खोचक टोला

Gulshan Grover | बॉलिवूड अभिनेते माझाच लूक कॉपी करतात; अभिनेते गुलशन ग्रोव्हर यांच्या वक्तव्याची बॉलिवूडमध्ये चर्चा