विराट कोहलीने अनुष्कापूर्वी ब्राझीलच्या अभिनेत्रीला केले होते डेट ? व्हायरल होताहेत फोटो

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा एकमेकांवर खूप प्रेम करतात. या दोघांना परफेक्ट कपल मानले जाते. पण आता विराट कोहलीबाबतच एक बातमी समोर आली आहे. अनुष्का शर्माला डेट करण्यापूर्वी विराटने ब्राझीलची अभिनेत्री इजाबेल लेइट हिला डेट केल्याचे सांगण्यात येत आहे.

विराट कोहलीने इजाबेल लेइट हिला डेट करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. इजाबेलने बॉलिवूडमध्येही काम केल्याची माहिती समोर आली आहे. तिने 2012 मध्ये रिलिज झालेल्या ‘तलाश : द आंसर लाइज विदिन’ या फिल्ममध्ये आमीर खानसोबत भूमिका साकारली होती. अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये येण्यापूर्वी विराट कोहलीने इजाबेलला दोन वर्षांपर्यंत डेट केले. इजाबेल ही अनेक हिंदी आणि तेलुगू फिल्ममध्ये नजर आली. तिने गुरु रंधावासह म्युझिक व्हिडिओ ‘लाहोर’मध्येही दिसली होती.

इजाबेल हिच्यासोबत डेटिंगवर गेल्यानंतर विराट कोहली अनुष्का शर्माला भेटला. त्यावेळी तो अत्यंत निराश दिसत होता. विराटने अमेरिकेतील टीव्ही स्पोर्ट्स रिपोर्टर ग्राहम बेनसिंगरसोबत संवाद साधला तेव्हा माझी पहिली भेट अनुष्कासोबत झाली तेव्हा मी जोक मारला होता, असेही यामध्ये सांगितले आहे.