World Cup 2019 : वर्ल्ड कप सुरु होण्याआधीच विराटला मिळाला ‘हा’ मोठा सन्मान

इंग्लड : वृत्तसंस्था – विश्वाचषकाला आजपासून सुरुवात झाली आहे. भारतीय संघ विश्वचषकाचा प्रबळ दावेदार मानला जातो. स्पर्धा सुरु होण्याआधीच भारतीय कर्णधार विराट कोहलीला मोठा सन्मान मिळाला आहे. मेणाच्या पुतळ्यांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या मादाम तुसाँने विराट कोहलीच्या पुतळ्याचं अनावरण केलं आहे. क्रिकेटची पंढरी म्हटलं जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं.

विश्वचषकाचे औचित्य साधून विराट कोहलीच्या पुतळ्याचं अनावरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. यंदा आयसीसीच्या क्रमवारीत विराट जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरला. त्यामुळे विराटचा पुतळा १५ जुलै म्हणजेच मादाम तुसाँमध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

पुढील काही आठवडे संपूर्ण देशभरात क्रिकेटचा फिव्हर असणार आहे. यामुळे आमचे शेजारी लॉर्ड्सच्या मदतीने विराट कोहलीच्या पुतळ्याचं अनावरण करण्याची यापेक्षा चांगली संधी नव्हती. आम्ही अपेक्षा करतो की क्रिकेटचे चाहते मैदानात आपल्या हिरोला फक्त खेळताना पाहून आनंद घेणार नाहीत तर मादाम तुसाँमध्ये येऊन त्यांच्यासोबत क्रीज शेअर करतील, असं मादाम तुसाँ लंडनचे महाव्यवस्थापक स्टीव्ह डेव्हिस यांनी सांगितलं.

विराटचा हा पुतळा भारतीय संघाच्या जर्सीमध्ये आहे. पुतळ्यातील विशेष म्हणजे वापरलेले शूज आणि ग्लोव्हज आहेत. ते स्वतः विराटने दिले आहे.

दरम्यान, विश्वचषकातील समान्यांना सुरुवात झाली आहे. भारतीय संघ ५ जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरोधात आपला पहिला सामना खेळणार आहे.