प्रेग्नंसीच्या चर्चांवर अभिनेत्री अनुष्का शर्मा म्हणते…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अॅक्ट्रेस अनुष्का शर्माने 2017 साली टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीसोबत लग्नगाठ बांधली. लग्नानंतर अनुष्का जास्त करून सिनेमात दिसलीच नाही. 2018 साली आलेल्या शाहरुख खानच्या झिरो या सिनेमात ती शेवटची दिसली होती. यानंतर तिने कोणताही सिनेमा साईन केला नाही. अशीही कोणती माहिती नाही की, ती एखाद्या सिनेमात काम करत आहे.

अनुष्का जवळपास एका वर्षापासून सुट्टीवर आहे. सध्या ती विराटसोबत टाईम स्पेंड करत आहे. काही दिवसांपूर्वी ती एका क्लिनीक बाहेर स्पॉट झाली होती. तेव्हापासून अंदाज लावला जात आहे की, ती प्रेग्नंट आहे. आता यावर अनुष्कान मौन सोडले आहे. एका मुलाखतीत बोलताना तिने सांगितले की, ती प्रेग्नंट आहे किंवा नाही याबाबत कोणालाही कसलेही स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता नाही.

अनुष्का म्हणाली की, “अॅक्ट्रेस जर विवाहित असेल तर लोक विचारतात की, ती प्रेग्नंट आहे का ? जर ती कोणाला डेट करत असेल तर लोक विचारतात की, ती लग्न करणार आहे की नाही ? हे खूपच वाईट आहे. तुम्ही सेलेब्रिटीला इतकी सवलत द्यायला हवी की, ते आपल्या मर्जीप्रमाणे आपले आयुष्य जगू शकतील. प्रत्येक गोष्टीत उडी घेण्याची काय गरज आहे. तुम्ही असं काही का करता की, सेलेब्रिटीला जबरदस्तीने स्पष्टीकरण द्यावे लागेल ? मला काही स्पष्टीकरण देण्याची गरज आहे का ? नाही !

पुढे अनुष्का म्हणाली की, “अॅक्ट्रेसने लग्न केलं तर तिच्याविषयी काही ना काही बोलणं सुरु होतं. जर कोणी सैल कपडे घातले असेल तर ते ट्रेंडी असू शकतात ना. परंतु लोक सैल कपडे पाहून बोलू लागतात की, ती अॅक्ट्रेस प्रेंग्नंट आहे.”

आरोग्यविषयक वृत्त