विराट सचिनचा ‘हा’ रेकॉर्ड कधीही मोडू शकणार नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताचा माजी खेळाडू आणि महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याची नेहमीच तुलना होत असते. अनेक वेळा दोघांपैकी कोण श्रेष्ठ आहे यामध्ये चाहत्यांमध्ये लढाईदेखील होत असते. त्यानंतर आता भारताचा माजी धडाकेबाज सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याने म्हटले आहे कि, सचिनचा प्रत्येक रेकॉर्ड कोहली मोडेल. मात्र, एक रेकॉर्ड त्याला कधीही मोडता येणार नाही.

एका खासगी वेबसाईटला मुलाखत देताना त्याने हे भाष्य केले आहे. यावेळी विराट कोहलीविषयी बोलताना तो म्हणाला कि, कोहली सध्या जगातील सर्वोत्तम फलंदाज असून तो ज्या पद्धतीने खेळत आहे ते कौतुकास्पद आहे. यावेळी तो म्हणाला कि, कोहली सचिनचे प्रत्येक रेकॉर्ड मोडेल मात्र त्याला सचिनचा सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा रेकॉर्ड मोडता येणार नाही. त्याचबरोबर विराट कोहली हा कसोटी सामन्यांमध्ये स्टीव्ह स्मिथ पेक्षा सरस असल्याचे म्हटले आहे. त्याने कोहलीला बेस्ट फलंदाजांचा पुरस्कार देऊन टाकला आहे. त्याचबरोबर त्याने यावेळी संवाद साधताना भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समिती अध्यक्षपदी अनिल कुंबळे याची निवड करावी असे म्हटले आहे. कुंबळे हा या पदासाठी योग्य उमेदवार असून त्याने तरुण खेळाडूंना मार्गदर्शन देखील केले आहे.

दरम्यान, वीरेंद्र सेहवाग याच्या या भाष्यावर कर्णधार कोहली आणि सचिन तेंडुलकर यांच्याकडून काय प्रतिक्रिया येतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.