धावांचा पाठलाग करताना वर्षभरात ६ वा पराभव

पर्थ : वृत्तसंस्था – भारतीय संघाला दुसऱ्या कसोटीत पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी ठेवलेल्या २८७ धावांचा पाठलाग करताना भारताचा संपूर्ण संघ १४० धावांवर माघारी परतला. पाचव्या दिवशी अवघ्या १५  षटकांत भारताचे उर्वरित पाच फलंदाज माघारी परतले. २०१८ मध्ये धावांचा पाठलाग करताना भारताचा हा सहावा पराभव ठरला आहे. या पराभवानंतर कर्णधार विराट कोहलीच्या नावावर मात्र नकोसा विक्रम नोंदवला गेला. हाच विक्रम पुढेही वाढत राहिल्यास तो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही मागे टाकू शकतो.

भारताला २०१८ या वर्षात धावांचा पाठलाग करताना सहा पराभव पत्करावे लागले आहेत. दक्षिण आफ्रिकेत भारताला दोन वेळा धावांचा पाठलाग करता आला नव्हता, तर इंग्लंडमध्येही तीन सामन्यांत ते अपयशी ठरले आणि आता पर्थवरही त्याची पुनरावृत्ती झाली.

पर्थ कसोटीच्या पहिल्या डावात कोहलीने 123 धावा करूनही भारत पराभूत झाला आणि कोहलीच्या नावावर नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे. कर्णधार म्हणून शतक झळकावूनही संघाला सर्वाधिक पराभव पत्करावा लागल्याचा विक्रम कोहलीच्या नावावर नोंदवला गेला आहे. कर्णधार कोहलीने शतक झळकावल्यानंतरही भारत सहा कसोटी सामन्यात पराभूत झाला आहे.

या विक्रमात ब्रायन लारा (५) आणि स्टीव्ह वॉ (४) अनुक्रम दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहेत. हीच मालिका कायम राहिल्यात कोहली तेंडुलकरलाही मागे टाकू शकतो. तेंडुलकरची अकरा शतकं ही भारताला विजय मिळवून देऊ शकलेली नाही. भारतीयांमध्ये हा विक्रम तेंडुलकरच्याच नावावर आहे आणि त्यापाठोपाठ मोहम्मद अझरुद्दीन ( ७) आणि  कोहली (६)  यांचा क्रमांक येतो.

कुत्र्याला मारहाण पडली महागात ; भावाचा खुन केल्याबद्दल धाकटा पोलीस कोठडीत