अनुष्का शर्माची ‘पाताल लोक’ पाहिल्यानंतर विराट कोहलीनं दिली ‘अशी’ प्रतिक्रिया


पोलिसनामा ऑनलाइन –
बॉलिवूड स्टार आणि एक प्रोड्युसर अनुष्का शर्मानं प्रोड्युस केलेली पाताल लोक ही वेब सीरिज नुकतीच अ‍ॅमेझॉन प्राईमवर रिलीज झाली. या सीरिजला चाहत्यांपासून तर क्रिटीक्स पर्यंत सर्वजण हिट म्हणत आहे. खास करून स्टोरी आणि अ‍ॅक्टींग सर्वांनाच आवडली आहे. टीम इंडियाचा कॅप्टन आणि अनुष्का शर्माचा पती विराट कोहली यानंही पाताल लोक त्याला आवडली आहे असं सांगितलं आहे.

विराटला आवडली पाताल लोक

विराटनं याबद्दल ट्विट केलं आहे. त्यानं असाही खुलास केला आहे की, त्यानं ही सीरिज सर्वांच्या आधी आणि खूप आधीच पाहिली आहे. ट्विट करत विराट म्हणतो, “या उत्तम वेब सीरिजच्या प्रोड्युसरसोबत लग्न करण्याचा हा फायदा आहे की, मी खूप आधीच ही सीरिज पाहिली आहे. मला खूप आडवली. क्लीन स्लेट फिल्म्स (Clean Slate Films) वेल डन.”

‘ही वेब सीरिज मास्टरपीस’

विराटनं इंस्टावरून पोस्ट शेअर करत या सीरिजचं कौतुक केलं आहे. मी आता ही पूर्ण सीरिज पाहिली आहे. मला माहिती आहे हा एक मास्टरपीस आहे. स्टोरीपासून तर अॅक्टींगपर्यंत, सर्वकाही उत्तम आहे. मला अनुष्काचा अभिमान आहे की, तिनं अशी सीरिज प्रोड्युस केली आहे.”