ICC वन-डे क्रमवारीत विराट-रोहित अव्वल, तर गोलंदाजांमध्ये बुमराह दुसर्‍या स्थानावर

पोलिसनामा ऑनलाईन – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा या दोघांनीही आयसीसीच्या वन-डे क्रमवारीत पहिले आणि दुसरे स्थान कायम ठेवले आहे. तर गोलंदाजांच्या यादीत भारतीय गोलंदाज बुमराह दुसर्‍या स्थानावर आहे. काल जाहीर करण्यात आलेल्या रँकिंगमध्ये कोहली 871 गुणांसह टॉपवर आहे. तर रोहित 855 गुणांसह दुसर्‍या स्थानावर आहे.

गोलंदाजांच्या यादीमध्ये न्यूझिलंडचा ट्रेंड बोल्ट (722 गुण) पहिल्या स्थानावर आहे. तर बुमराह (719 गुण) दुसर्‍या स्थानावर आहे. अफागाणिस्तानचा मुजीब उर रहमान 701 गुणांसह तिसर्‍या स्थानावर आहे. ऑलराउंडर खेळाडूंच्या यादीत टॉप 10 खेळाडूंच्या यादीत रविंद्र जडेजा एकमेव भारतीय खेळाडू असून तो आठव्या स्थानावर आहे. अफगानिस्तानचा मोहम्मद नबी या यादीत टॉपवर आहे. तर इंग्लंडचा बेन स्टोक्स दुसर्‍या स्थानावर आहे. यादरम्यान, रॅकिंगच्या दृष्टिने इंग्लंडचा जेसन रॉय आणि जॉनी बेयरस्टोच्या कामगिरीवर नजर असणार आहे. 30 जुलै पासून आयसीसीच्या बहुचर्चित स्पर्धेला सुरुवात होणार आहे. भारतात 2023 साली होणार्‍या स्पर्धेत पात्र ठरण्यासाठी ही स्पर्धा प्रत्येक संघासाठी महत्वाची आहे. 4 महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झालेली असली तरीही डिसेंबर महिन्याखेरीस भारतीय क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी मैदानात उतरताना दिसणार नाहीत. त्यामुळे आपल्या लाडक्या क्रिकेटपटूंना मैदानात पाहण्यासाठी भारतीय चाहत्यांना थोडी वाट पहावी लागणार आहे.