वीरभद्र सिंह यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

शिमला : वृत्तसंस्था

प्रकृती बिघडल्याने हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांना येथील इंदिरा गांधी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. गुरुवारी संध्याकाळी त्यांच्या छातीत अचानक दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

[amazon_link asins=’B07B6SN496,B01N0WVC16′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d9287d2c-acd9-11e8-a8e7-970b47860cce’]

गुरुवारी संध्याकाळी साडेपाच वाजता वीरभद्र सिंह यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर कुटुंबियांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या प्राथमिक तपासणी अहवालात कोणतीही गंभीर समस्या आढळून आली नाही. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून २ दिवसात त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल. काही वैद्यकीय चाचण्या चालू आहेत. डॉक्टर वीरभद्र सिंह यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून असल्याची माहिती आयजीएमसीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जनक राज यांनी दिली आहे. सिंह हे एप्रिल १९८३ मध्ये पहिल्यांदा हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री झाले होते. त्यानंतर ते तीन वेळा हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री होते.