PM मोदींचा फोटो ट्विट करत सेहवागच्या चहलला ‘हटके’ शुभेच्छा !

पोलिसनामा ऑनलाईन – भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. युजवेंद्र चहलचा यू-ट्युबर धनश्री वर्मासोबत घरच्या घरी छोटेखानी साखरपुडा सोहळा संपन्न झाला. चहल आणि धनश्रीने सोशल मीडिया अकाऊंटवरुन ही माहिती दिली. त्यानंतर भारताचा धडाकेबाज खेळाडू विरेंद्र सेहवाग यानेही युजवेंद्र चहल-धनश्री जोडीला त्याच्या स्टाइलमध्ये शुभेच्छा दिल्या आहेत.

सेहवागने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटो कल्पक पद्धतीने वापरुन चहलला शुभेच्छा दिल्या. एका भाषणात मोदी म्हणाले होते की संकट काळातदेखील आपण सकारात्मक संधी शोधायला हव्या. मोदींचा हाच संदेश विनोदी पद्धतीने वापरत त्याने चहल-धनश्रीला शुभेच्छा दिल्या आहेत. धनश्री वर्मा ही भारतातल्या प्रसिद्ध यू-ट्युबर पैकी एक मानली जाते. तिच्या यू-ट्युब चॅनलचे 1.5 मिलियन फॉलोअर्स आहेत. अनेकांना चहल आणि धनश्री वर्माच्या या बातमीने आश्चर्याचा धक्का बसला. लॉकडाउन काळात चहल घरात बसून आपल्या परिवारासोबत वेळ घालवत होता. अनलॉक काळात चहलने सरावासाठी सुरुवात केली होती. आयपीएल 2020 मध्ये तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून खेळणार आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like