Video : सेहवागकडून अनेक खेळाडूंची ‘पोलखोल’ ; ‘विरू’ म्हणाला, ‘सचिन तेंडुलकर सर्वात वाईट डान्सर’

पोलिसनामा ऑनलाईन टीम : समालोचन करणाऱ्या अनेक माजी खेळाडूंच्या मुलाखती छोट्याश्या मुलाखती सध्या चालू असणाऱ्या विश्वचषकामध्ये घेतल्या जात आहेत. ‘डिशींग द डर्ट’ या नावाखाली या मुलाखती घेतल्या जात असून यामध्ये खेळाडूंना आपल्या काळातील संघ सहकार्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात येतात. केवळ २ ते ३ मिनिटांच्या या मुलाखतींमध्ये रॅपीड फायर प्रकारातील प्रश्न विचारले जातात. या मुलाखतीचे विडिओ आयसीसी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंट वर देखील पोस्ट करत आहे.

आयसीसीने भारताचा धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवाग याचीदेखील मुलाखत घेतली असून मुलाखतीचा एक छोटा व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये त्याने अनेक मजेदार प्रश्नांची उत्तरे आपल्या खास शैलीत दिलेली आहेत.

हि प्रश्नोत्तरे पुढीलप्रमाणे :

१. तुझ्या कारकिर्दीच्या काळात सेल्फी काढणं सर्वात जास्त कोणाला आवडायचं ?
उत्तर: त्यावेळी सेल्फीचा नव्हते. पण आत्ताचं सांगायचं झालं तर मी विराट कोहलीचं नाव घेईल. जेथे जाईल तेथे तो सेल्फी काढतो आणि सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. त्याबरोबर कॉमेन्ट्री बॉक्सचं विचारला तर मीच सर्वाधिक आणि सर्वांबरोबर सेल्फी काढत असतो.

२. सर्वात वाईट डान्सर कोण ?
उत्तर: सचिन तेंडुलकर

३. तयार होण्यामध्ये सर्वात जास्त वेळ कोणता खेळाडू घालवतो ?
उत्तर: हरभजन सिंग

४. सर्वात चांगला स्वयंपाक कोण बनवतं ?
उत्तर: सचिन तेंडुलकर. सगळे खादयपदार्थ तो बनवतो. ऑमलेट, अंडी, वरण-भात तुम्ही काहीही सांगा सचिन पाजी ते बनवतात.

५. सर्वात चांगला गायक कोण ?
उत्तर: सुरेश रैना. माझ्याबद्दल विचाराल तर मी बाथरूम सिंगर आहे.

६. ड्रेसिंग रुममध्ये तू कोणाला सर्वाधिक घाबरायचा? आणि का?
उत्तर: अनिल कुंबळे. कारण अनिल कुंबळे मैदानावर सतत ओरडायचा.

७. सगळ्यात चांगले जोक कोण सांगायचं?
उत्तर: हरभजन सिंग आणि युवराज सिंग

७) टूरवर असताना कोणाबरोबर रुम शेअर करायला आवडायची नाही? आणि का?
उत्तर : एम. एस. धोनी. कारण तो रुम बाहेर पडल्यावर अनेक लोकं त्याच्या मागे लागतात.

९. कोणता खेळाडू स्वत:च नाव सर्वाधिक वेळा गुगल करत असावा असे वाटते ?
उत्तर : सौरभ गांगुली. कारण त्याला सर्व विक्रम ठाऊक असतात.

१०. संगीतामध्ये सर्वात वाईट निवड कोणाची आहे?
उत्तर : युवराज सिंग. कारण तो केवळ ‘ढिंग् चिक् ढिंग् चिक्’ असणारे गाणेच ऐकतो.

११. सकाळी उठल्या उठल्या चीड चीड करणारा खेळाडू कोण ?
उत्तर: झहीर खान

१२. प्रवासास निघताना टीममध्ये येण्यास नेहमी उशीर करणारा खेळाडू कोणता?
उत्तर: व्ही. व्ही. एस. लक्ष्मण

१३. नेहमी जीममध्ये आढळणारा खेळाडू कोणता?
उत्तर: माझ्या वेळी राहुल द्रविड आणि आता विराट कोहली.

१४. रोमॅन्टीक कॉमेडी सिनेमे सर्वाधिक आवडणारा खेळाडू कोण?
उत्तर: कदाचित मीच. विशेषतः गोविंदाचे सिनेमे मला खूप आवडतात.