‘भोले के भक्त, हनुमान के चेले, सब कुछ जीत लेंगे अकेले’ : सेहवाग

नवी दिल्ली : वृत्तसंस्थ – भारतीय संघाचा माजी धडाकेबाज सलामीवीर विरेंद्र सेहवाग हा नेहमीच त्याच्या सोशल मोडियावरील पोस्ट तसेच ट्विट्मुळे चर्चेत असतो. त्याच्या मजेशीर ट्विटमुळे त्याचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फॉलोवर्स देखील आहेत. तो नेहमी वेगवेगळे फोटोज तसेच ट्विट करत असतो.

यावेळी देखील तो एका नवीन फोटोमुळे चर्चेत आला असून, यावेळी त्याने भगवा कुर्ता आणि धोतर घातलेला फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर अपलोड केला असून त्याच्यावर नेटिझन्सनी मोठ्या प्रमाणात कमेंट केल्या आहेत. फोटोखाली त्याने कॅप्शन लिहिले कि, ‘भोले के भक्त, हनुमान के चेले, सब कुछ जीत लेंगे अकेले’. त्याच्या या नवीन अवतारामुळे त्याच्या फोटोवर मोठ्या प्रमाणात हटके कमेंट्स देखील पाहायला मिळाल्या.

त्याच्या एका चाहत्याने त्याच्या फोटोवर कमेंट करताना लिहिले कि, ‘वीरू बाबा की जय हो’, ‘बम बम भोले’, जय श्री राम, ‘जय बाबा जी’. त्याने हा फोटो अपलोड केल्यानंतर त्याच्या फोटोवर काही तासांत लाखांच्या घरात लाईक्स मिळाल्या आहेत. सध्या सेहवाग कोणत्याही प्रकारचे क्रिकेट खेळत नसून तो मोकळा असल्याने असे अनेक कल्पक फोटो तसेच मॅसेज तो सोशल मीडियावर अपलोड करत असतो.

दरम्यान, यामागील काही दिवसांपूर्वी देखील त्याने अशीच मजेशीर पोस्ट केली होती. यामध्ये त्याने ‘मला सीलेक्टर व्हायचंय. ही संधी कोण देणार?’, असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी त्याची फिरकी घेत मजेशीर कमेंट्स देखील केल्या होत्या.

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like