Corona Lockdown : ‘लॉकडाउन’मध्ये सेहवाग कुटूंबासोबत पाहतोय ‘ही’ मालिका

पोलीसनामा ऑनलाइन टीम – भारताचा धडाकेबाज किकेटपटू विरेंद्र सेहवागचे नाव घेताच भल्याभल्या गोलंदाजाची भंबेरी उडत होती. चौकार, षटकारांचा पाऊस. कधीकाळी क्रिकेटच्या मैदानात गोलंदाजांची धुलाई करणारा सेहवाग देखील सध्या लॉकडाउनमुळे घरात कैद झाला आहे. मात्र या लॉकडाउनच्या काळात तो घरात बसून करतोय तरी काय ? याचे उत्तर स्वत: सेहवागने एक व्हिडीओच्या माध्यमातून दिले आहे.

विरेंद्र सेहवाग कुटुंबियांसोबत ‘राधेकृष्ण’ ही मालिका पाहत आहे. स्टार प्लसवरील मालिकेला पुन्हा एकदा सुरु करण्यात आले आहे. या मालिकेचे पुर्नप्रक्षेपण रोज सध्याकाळी 7 वाजता केले जाते. ही मालिका पाहून सेहवाग आपला वेळ घालवत आहे.‘राधाकृष्ण’ या मालिकेचे पहिले पर्व 2018मध्ये स्टारप्लस वाहिनीवर दाखवले जात होते. ही मालिका भगवान कृष्ण यांच्या पौराणिक कथांवर आधारित आहे. या मालिकेत अभिनेता सुमेध मुद्गलकर यांनी कृष्ण ही व्यक्तिरेखा साकारली होती. तर राधेच्या भूमिकेत अभिनेत्री मल्लिका सिंह झळकली होती. अफलातून कथानकामुळे ही मालिका सुपरहिट झाली होती. आजही देशातील विविध भागात या मालिकेचे चाहते आहेत. दरम्यान, कोरोनामुळे देशात लॉकडाउन करण्यात आल्यामुळे मी कुटूंबियासोबत राधेकृष्ण मालिका पाहत असल्याचे सेहवानगे सांगितले आहे.