वीरेंद्र सेहवाग ‘या’ कारणामुळे झाला ट्रोल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमधील भारतीय संघाच्या सेमीफायनलमधील पराभवानंतर भारतीय संघावर क्रीडा रसिक नाराज आहेत. त्याचबरोबर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना देखील पदावरून हटवण्यात येणार आहे. यासाठी पाच नावांची निवड अंतिम झाली असून लवकरच म्हणजे शुक्रवारी भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी मुलाखती देखील घेण्यात येणार आहेत.

त्यानंतर आत भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग चर्चेत आला आहे. सेहवागने २०१७ मध्ये  भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदासाठी अर्ज केला होता.  सेहवागकडे आयपीएलमध्ये पंजाब संघाचा मेंटॉर म्हणून अनुभव देखील आहे. मात्र आता त्याच्या एका ट्विटमुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे. या ट्विटमुळे त्याला चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील केले आहे. सेहवागने ट्विट करत म्हटले कि, मला निवड समितीमध्ये सहभागी व्हायचे आहे, कोण देणार मला जागा?”, त्याच्या या ट्विटनंतर त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले.  एका चाहत्याने त्याच्या ट्विटवर रिप्लाय देताना म्हटले कि, मी तर तुझ्यासाठी कधीच ५  हजार रुपयांची बोली देखील लावली आहे. तर एका चाहत्याने त्याची खिल्ली उडवताना म्हटले कि, आमच्या गल्लीत एक संघ असून त्यासाठी एका निवास समिती सदस्याची गरज आहे. निवड समिती सदस्य म्हणून तुला ५ हजार तर प्रशिक्षक म्हणून तुला १० हजार रुपये पगार मिळू शकतो.

या कारणामुळे व्हायचे आहे सिलेक्टर

भारतीय प्रशिक्षकपदाच्या निवड समितीत सहभागी होण्यासाठी कमीत कमी ६० वर्ष वय लागते. मात्र हा नियम वगळता सेहवाग सर्व नियमांमध्ये पात्र आहे. त्यांनतर त्याने आणखी एक ट्विट करत स्वतःचीच खिल्ली उडवली. एका कसोटी सामन्यात दोन्ही डावात तो शून्यावर बाद  झाला होता, त्यावर त्याने आर्यभट्टच्या शुन्याच्या संशोधनावर स्वत:ला ट्रोल केले. त्याने ट्विटमध्ये म्हटले कि, आजच्या दिवशी आठ वर्षांपूर्वी मी दोन्ही डावांत शून्यावर बॅड होऊन १८८ षटके फिल्डिंग देखील केली होती.  माझ्याकडून ही आर्यभट्ट यांना श्रध्दांजली आहे”,  असे ट्वीटमध्ये त्याने म्हटले.

आरोग्यविषयक वृत्त