Coronavirus : विरेंद्र सेहवागच्या ‘कोरोना’मुक्त आसनानं सर्वच झाले ‘हैराण-परेशान’ (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन टीम – देशभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातवारण आहे. अशा स्थितीत राजकारणी, बॉलीवूड, हॉलिवूडसह अनेकांनी जनजागृती सुरु केली आहे. अशाचत भारताचा माजी धडाकेबाज किकेटपटू विरेंद्र सेहवागनेही जनजागृतीसाठी सोशल मीडियाचा आधार घेत एक व्हिडिओ ट्वीट केला आहे.

भारतात कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी सध्या लोकांना स्वत:ची काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. यातच भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात कोरोनामुक्त आसान काय असते हे दाखवले आहे. हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला मेट्रो सीटवर एकटी बसलेली दिसत आहे. तिच्या शेजारीही बसण्यासाठी एक माणूस येतो, त्यावर ताबडतोब मुलगी संपूर्ण सीटवर आपले पाय पसरते. व्हिडीओ पोस्ट करताना सेहवागने कॅप्शनमध्ये, कोरोना प्रतिरोधक आसन, कृपया लोकांपासून दूर रहा आणि त्यांना दूर ठेवा. कृपया अंतर ठेवा आणि घरी रहा, असे लिहिले आहे.