पुलवामामध्ये शहीद झालेल्या 2 जवानाच्या मुलांना ‘फ्री’मध्ये शिकवतोय वीरेंद्र सेहवाग, Twitt केले फोटो

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संपूर्ण देश आज त्या सैनिकांची आठवण काढत आहे, जे की मागील वर्षी १४ फेब्रुवारीला जम्मू काश्मीर च्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले होते. या धक्कादायक घटनेने संपूर्ण देश हादरला होता, एक वर्ष उलटून गेल्यानंतरही जे सैनिक शहीद झाले होते त्यांच्याबद्दलचे दुःख कमी झाले नाही किंवा ते कमी होऊ शकत नाही. संपूर्ण देश आपापल्या पद्धतीने या वीर पुत्रांना श्रद्धांजली वाहत आहेत. या हल्ल्यात शहीद झालेल्या २ सैनिकांची मुले भारताचे माजी फलंदाज आणि सलामीवीर वीरेंद्र सेहवागच्या शाळेत शिकत आहेत.

पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांच्या दोन मुलांना आपल्या शाळेत शिक्षण देत आहे. सेहवाग वीरू पाजी च्या नावाने प्रसिद्ध असलेल्या सेहवागने ट्विटर वर त्या दोन मुलांचा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये एक मुलगा फलंदाजी करताना दिसत आहे तर दुसरा गोलंदाजी करताना दिसत आहे. वीरू ने फोटो शेअर करत लिहिले की, या फोटोंमधील पहिल्या फोटोत अर्पित फलंदाजी करताना दिसत आहे, जो पुलवामा हल्ल्यातील शहीद झालेले सैनिक राम वकील यांचा मुलगा आहे तर दुसऱ्या फोटोत गोलंदाजी करणारा राहुल सोरेंग आहे, जो की पुलवामा मध्ये शहीद झालेले सैनिक विजय सोरेंग यांचा मुलगा आहे.

सेहवागची शाळा हरियाणामध्ये आहे
पुलवामा हल्ल्यानंतर वीरूने सैनिकांना मदत करण्याविषयी सांगितले होते आणि त्यानंतर त्याने दोन मुलांना शिक्षण देण्याची जबाबदारी घेतली होती. भारतासाठी २५१ एकदिवसीय, १०४ कसोटी आणि १९ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या सेहवागने पुढे लिहिले की मला अभिमान आहे की ते दोन्ही मुलं माझ्या शाळेत शिकत आहेत. सेहवागची शाळा ही हरियाणामध्ये स्थित आहे