चौथ्यांदा अंतराळात पडली भारतीय पावले, सिरिशाने Virgin Galactic ने घेतले यशस्वी उड्डाण (व्हिडीओ)

लास क्रुसेस : वृत्त संस्था – भारतीय वंशाची सुकन्या सिरिशा बांदलाने वर्जिन गॅलेक्टिक (Virgin Galactic) च्या युनिटी-22 ने रविवारी रात्री 8 वाजता अंतराळात यशस्वी उड्डाण घेतले. अंतराळात चौथ्यांदा एका भारतीयाचे पाऊल पडले आहे. सिरिशा बांदला चौथी भारतीय वंशाची आहे आणि तिसरी भारतीय वंशाची महिला आहे, जिने अंतळराळात उड्डाण घेतले आहे. यापूर्वी स्कवाड्रन लीडर राकेश शर्मा, कल्पना चावला आणि सुनीता विलियम्स यांनी अंतराळ आणि स्पेश स्टेशनचा प्रवास केला आहे.

सिरिशा बांदला (Sirisha Bandla) रिचर्ड ब्रॅन्सन (Richard Branson) यांची स्पेस कंपनी वर्जिन गॅलेक्टिक (Virgin Galactic) चे अंतराळ यान VSS Unity मध्ये बसून अंतराळाच्या प्रवासाला रवाना झाली आहे. सिरिशा बांदला रिचर्ड ब्रॅन्सन यांच्या पाच अंतराळ प्रवाशांपैकी एक आहे. सिरिशा वर्जिन गॅलेक्टिक कंपनीचे गव्हर्नमेंट अफेयर्स अँड रिसर्च ऑपरेशन्सची व्हाईस प्रेसीडेंट आहे. केवळ सहा वर्षात सिरिशाने वर्जिन गॅलेक्टिकमध्ये इतकी सीनियर पोस्ट मिळवली आहे.

VSS Unity ला यूनिटी 22 सुद्धा म्हटले जात आहे. यामध्ये एकुण 6 लोक गेले आहेत. दोन पायलट आणि चार पॅसेंजर. या क्रूमध्ये रिचर्ड ब्रॅन्सन यांचाही समावेश आहे. याचे लाँचिंग न्यू मेक्सिको येथील लास क्रुसेसच्या स्पेसपोर्ट अमेरिकातून झाले. युनिटी यान VMS Eve च्यावर लावून 50 हजार फुटाच्या उंचीवर नेऊन सोडले. यानंतर हे स्पेसक्राफ्ट स्वताच अंतराळाकडे गेले. अंतराळाचा हा प्रवास सुमारे 1 तास 5 मिनिटा होता. यानंतर VSS Unity परत स्पेसपोर्टवर लँड करेल.

स्पेसपोर्टने लाँच ते लँडिंगपर्यंत एकुण वेळ सुमारे 90 मिनिटाचा असेल. VSS Unity सुमारे मिनिटापर्यंत पृथ्वीच्या खालच्या कक्षेत राहील. या दरम्यान अंतराळ प्रवाशांना झीरो ग्रॅव्हिटीची जाणीव होईल. रिचर्ड यांच्यासह चीफ एस्ट्रोनॉट इन्स्ट्रक्टर बेथ मोसेस (Beth Moses), लीड ऑपरेशन्स इंजिनियर कोलिन बेनेट (Colin Bennett), गव्हर्नमेंट अफेयर्स अँड रिसर्च ऑपरेशन्सची व्हाईस प्रेसीडेंट सिरिशा बांदला (Sirisha Bandla) होते.

VSS Unity डेव्ह मॅके (Dave Mackay) आणि मायकल मासुसी (Michael Masucci) उडवतील. तर, VMS Eve पायलट सीजे सट्रकोव्ह आणि केली लॅटीमर उडवतील.

सिरिशा आंध्र प्रदेशच्या गुंटूर येथे राहणारी आहे. सिरिशाने पर्ड्यू युनिव्हर्सिटीतून एयरोनॉटिकल / एस्ट्रोनॉटिकल इंजिनियरिंगमध्ये ग्रॅज्युएशन केले आहे.
यानंतर तिने जॉर्जटाऊन युनिव्हर्सिटीतून MBA ची डिग्री घेतली आहे.
सिरिशा सध्या वर्जिन ऑर्बिटचे वॉशिंग्टन ऑपरेशन्स सुद्धा सांभाळत आहे. सिरिशा टेक्सासच्या ह्यूस्टनमध्ये वाढली आहे.

हे देखील वाचा

 

Web Title : virgin galactic unity 22 sirisha bandla indian american astronaut

हे देखील वाचा

Pune Crime News | पुण्यातील प्रसिध्द ज्योतिषी रघुनाथ येमूलला पुणे पोलिसांकडून अटक,
जाणून घ्या प्रकरण

Toxic Shock Syndrome | महिलांसाठी जीवघेणा आहे टॉक्सिक शॉक सिंड्रोम,
जाणून घ्या याची लक्षणे

Income Tax रिटर्न भरण्याचे टेन्शन संपले ! नवीन ई-पोर्टलवर मिळतील CA,
जाणून घ्या कसा मिळेल लाभ

UP ATS Action | 15 ऑगस्टला करायचा होता मोठा ‘धमाका’,
दहशतवादी घडवणार होते संपूर्ण युपीत बॉम्बस्फोट