Virgin Hyperloop | केवळ 1 तास 22 मिनिटाचा असेल दिल्ली ते मुंबई प्रवास, येतीय जबरदस्त टेक्नॉलॉजी, जाणून घ्या कशी करणार काम?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Virgin Hyperloop | दिल्ली ते मुंबईचा प्रवास (Delhi to Mumbai travel) केवळ 1 तास 22 मिनिटात होणार आहे. होय… तुमचा विश्वास बसणार नाही पण हे सत्य आहे. कारण, व्हर्जिन ग्रुप (Virgin Hyperloop) चे हायपरलूप 2014 पासून विकास आणि चाचणीच्या स्थितीतून जात आहे. ही टेक्नॉलॉजी यशस्वी झाल्यास जगभरात पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये मोठे बदल होऊ शकतात.

व्हर्जिन हायपरलूपने आपल्या महत्वाकांक्षी योजनेची व्याख्या करताना एक नवीन कन्स्पेट व्हिडिओ जारी केला आहे जो प्रवाशांना 1000 किमी प्रति तास वेगाने प्रवास करण्याची परवानगी देईल. हा वेग साधारण ट्रेनच्या तुलनेत जवळपास 10 पट जास्त आहे.

यातून प्रवासाचा वेळ खुप कमी होऊ शकतो. अमेरिकन वाहतूक तंत्रज्ञान कंपनीने यास मोठ्या प्रमाणात वाहतूकीचे नवीन रूप म्हटले आहे, ज्यामुळे प्रवाशी काही मिनिटात एका शहरातून दुसर्‍या शहरात प्रवास करू शकतील.

 

दिल्ली ते मुंबई 1 तास 22 मिनिटाचा प्रवास

हायपरलूपच्या वेबसाइटवरील रूट एस्टिमेटरनुसार, दिल्ली ते मुंबई जवळपास 1,153 किलोमीटरच्या अंतराचा प्रवास केवळ 1 तास 22 मिनिटात पूर्ण करता येईल.

 

पर्यावरणाच्या दृष्टीने चांगले तंत्रज्ञान

व्हर्जिन हायपरलूप सिस्टम एयरलॉक्सचा वापर करते ज्यामुळे यात सुरक्षा जास्त असते.
इमर्जन्सीच्या स्थितीत प्रवासी बाहेर पडण्यासाठी ट्यूबमध्ये प्रत्येक 75 मीटरवर इमर्जन्सी एग्झिट असेल.
पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा हे तंत्रज्ञान चांगले आहे आणि यामुळे खुप कमी प्रदूषण होते.

 

कसे काम करते हे तंत्रज्ञान?

हायपरलूप पॉड्स ट्यूबमध्ये ट्रॅव्हल करते जी व्हॅक्यूम बनवते.
हे पॉड्स स्पीड वाढवण्यासाठी मॅग्नेटिक लेव्हिटेशन आणि प्रोपल्शन टेक्नॉलॉजीचा सुद्धा वापर करतात.
ट्रेनप्रमाणे हे पॉड्स एकसोबत ट्रॅव्हल करू शकतात पण ते एकत्र जोडलेले नसल्याने ते वेगवेगळ्या लोकेशनला जाऊ शकतात.

Web Title : Virgin Hyperloop | delhi to mumbai in 1 hr 22 minutes virgin hyperloop releases new video of passenger pods

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Mumbai Police | वस्तू गहाळ झाल्याची पोलीस ठाण्यात तक्रार देताना अ‍ॅफिडेव्हिटची गरज नाही, मागणी केल्यास होणार कारवाई

Pune Crime | पुण्यातील उद्योजकाच्या बंगल्यात सापडले एअर रायफल, 31 काडतुसे, नोटा मोजण्याच्या 2 मशीन; 70 लोकांकडून घेतलेले वीना सह्यांचे खरेदी खत जप्त

Digital Currency in India | भारतात कधी सुरू होऊ शकते डिजिटल करन्सीची ट्रायल? RBI चे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले…