शासकीय इमारतीत माथेफिरूकडून अंदाधुंद गोळीबार ; १२ ठार, ६ जण जखमी

व्हर्जिनिया : वृत्तसंस्था – अमेरिकेतील व्हर्जिनियामध्ये एका माथेफिरूने केलेल्या गोळीबारात १२ जण ठार तर ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. व्हर्जिनियातील म्युनसिपल सेंटरमध्ये काल शुक्रवारी संध्याकाळी ४ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ज्या माथेफिरूने गोळीबार केला तो याच म्युनसिपल सेंटरमध्ये काम करणारा कर्मचारी होता. पोलिसांनी प्रत्युत्तर देत केलेल्या गोळीबारात हल्लेखोराचा मृत्यू झाला. मात्र या गोळीबारामागचे कारण समजू शकलेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोराने म्युनसिपल सेंटरमध्ये प्रवेश करून अंदाधूंद गोळीबार केला. यावेळी लोक आपल्या टेबलवर काम करत होते. या गोळीबारात १२ जण ठार तर ६ जण गंभीर जखमी झाले. या गोळीबारादरम्यान एक पोलीस कर्मचारी देखील जखमी झाला आहे. ही घटना घडल्यानंतर सतर्कता म्हणून शेजारील इमारतीदेखील रिकाम्या करण्यात आल्या.

You might also like