Virginity Test and Repairs | व्हर्जिनिटी पुन्हा मिळवण्यासाठी ही पद्धत अवलंबत आहेत तरूणी, बॅनची मागणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Virginity Test and Repairs | व्हर्जिनिटी टेस्ट आणि रिपेयर (Virginity Test and Repairs) करण्याचा मुद्दा पुन्हा एकदा जोर पकडू लागला आहे. यावेळी याविरोधात ब्रिटनच्या डॅक्टरांनी (British doctors) आघाडी उघडली आहे. येथील डॉक्टरांचे म्हणणे आहे की, जोपर्यंत ’व्हर्जिनिटी रिपेयर’ (virginity repair) च्या नावावर बनावट ऑपरेशन (fake operation) बंद होणार नाही तोपर्यंत व्हर्जिनिटी टेस्टवर कायदा बनवण्याचा काहीही उपयोग नाही.

रॉयल कॉलेज ऑफ ऑब्स्टीट्रीशियन्स अँड गायनाकॉलोजिस्ट (RCOG) ने सरकारला इशारा देत व्हर्जिनिटी रिपेयर सर्जरीवर सक्तीने प्रतिबंध लावण्याची मागणी केली आहे.
मागील महिन्यात खासदारांच्या समितीने एक प्रस्ताव सादर केला होता ज्यामध्ये काही खासगी क्लिनिकद्वारे करण्यात येत असलेल्या व्हर्जिनिटी टेस्टला गुन्ह्याच्या श्रेणीत आणण्याची मागणी केली होती
(virginity test being conducted by some private clinics to be classified as a crime).

डॉक्टरांचे म्हणणे आहे की, एकीकडे तर सरकार व्हर्जिनिटी टेस्टवर कायदा बनवण्याचा दावा करत आहे तर दुसरीकडे व्हर्जिनिटी रिस्टोअर करण्याच्या प्रक्रियेवर कोणताही प्रतिबंध लावण्यास तयार नाही.
व्हर्जिनिटी रिपेयर सर्जरीमध्ये वजायनाच्या त्वचे (vaginal skin) चा एक लेयर (layer) ठिक केला जातो ज्यामध्ये हायमन (hymen) तुटलेली वाटत नाही.
या सर्जरीला हायमनोप्लास्टी (hymenoplasty) म्हटले जाते.

UK मध्ये बहुतांश मुली आणि महिलांना पूर्णपणे व्हर्जिन दाखवण्यासाठी त्यांचे आई-वडिल किंवा नातेवाईक हायमनोप्लास्टी (hymenoplasty) करून घेतात.
2020 मध्ये संडे टाइम्सने चौकशीनंतर अशा 22 प्रायव्हेट क्लिनिकचा खुलासा केला होता जे व्हर्जिनिटी रिपेयरच्या नावावर मोठी फी घेत आहेत.
एक वर्षाच्या आत येथील जवळपास 9,000 लोकांनी हायमेनोप्लास्टी आणि याच्याशी संबंधीत माहिती गुगलवर शोधली.

रॉयल कॉलेज ऑफ ऑब्स्टीट्रीशियन्स अँड गायनोकोलोजिस्टचे म्हणणे आहे की, जर व्हर्जिनिटी रिपेयरच्या प्रक्रियेवर प्रतिबंध लावला नाही तर व्हर्जिनिटी टेस्टिंगवर प्रतिबंध लावण्याचे प्रयत्न निष्फळ ठरतील.

 

RCOG ने सांगितले की हायमन रक्त पेशींच्या एका पडद्यासारखे असते. सामान्यपणे पहिल्यांदा सेक्स (First Sex) केल्यानंतर ब्लिडिंग (Bleeding) होते आणि हे फाटल्यानंतर ब्लिडिंग होत नाही.
तर डब्ल्यूएचओचे स्पष्ट म्हणणे आहे की, हायमनचा संबध सेक्ससोबत जोडता येऊ शकत नाही आणि व्हर्जिनिटी टेस्टिंग मानवधिकारांचे उल्लंघन आहे.

IKWRO महिला अधिकार संघटनेच्या कार्यकारी संचालक डायना नम्मी यांनी म्हटले की, हायमेनोप्लास्टी महिला आणि तरूणींच्या विरोधातील एक प्रकारची हिंसा आहे.
ही हानीकारक प्रथा आहे जी जबरदस्तीच्या विवाहाला प्रोत्साहन देते.

डायनाने यांनी म्हटले, हायमेनोप्लास्टी व्हर्जिनिटी रिस्टोअर करण्याची गॅरंटी नसते.
जर एखाद्या मुलीला आपल्या लग्नाच्या पहिल्या रात्री ब्लिडिंग (bleed on the first marriage night) झाले नाही तर तिला ऑनर अब्यूज होण्याचा धोका जास्त असतो.

 

Web Title : Virginity Test and Repairs | virginity repair surgery testing uk gynaecologists doctors

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune News | 6 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप ! पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्याविरुद्ध लोकायुक्तांकडे तक्रार दाखल

Post Office च्या ‘या’ योजनांमध्ये गुंतवणूक करून मिळवा प्राप्तीकराचा लाभ, जाणून घ्या याबाबत

ED Raid | दिवसभर ईडीचा धडाका ! शिवसेना खासदार गवळी, अनिल परब यांच्यानंतर आता ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रींच्या मागे ED

Army Recruitment Scam | …म्हणून त्याची मूळ शैक्षणिक व अन्य कागदपत्रे घेतली ताब्यात; लष्कर भरती पेपर फुटीप्रकरणातील आरोपींचा प्रताप