जुळ्या बहिणींचा विवाह जुळ्या भावांशी आणि आता सोबतच होणार दोघी ‘आई’, फोटो वायरल

पोलीसनामा ऑनलाइन – जुळ्या बहिण-भावांच्या अनेक गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील आणि पाहिल्या असतील, परंतु एक आगळीवेगळी कहानी आपल्या सर्वांना आश्चर्यचकित करणारी आहे. जुळ्या बहिणींनी एकाचवेळी दोन जुळ्या भावांशी विवाह केला आणि आता त्या सोबतच प्रेग्नंट आहेत.

जुळ्या बहिणी ब्रिटनी आणि ब्रीना डीन सलायर्स या दोघींनी जुळे भाऊ जोश आणि जेरेमी सालयर्स यांच्याशी विवाह केला. आता त्या एकाच वेळी आई होणार आहेत. ब्रिटनी आणि ब्रीनाने इन्स्टाग्रामवर एकाच वेळी प्रेग्नंट झाल्याचे सांगितले आहे. दोघींचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहेत.

आपल्या प्रेग्नंसीबाबत दोन्ही कपलने सांगितले की, आमची मुले एकमेकांचे केवळ चुलत भाऊच नसतील तर खुप इंटरेस्टींग गोष्टीचा भागसुद्धा असतील. आता आम्ही त्या दिवसाची वाट पहात आहोत, ज्यादिवशी मुले या जगात येतील आणि सर्वकाही खुप वेगळं दिसणार आहे.

सोशल मीडियावर दोन्ही कपलची स्टोरी आणि फोटो खूप वायरल होत आहेत. लोक लागोपाठ एकापेक्षा एक कमेंट करत आहेत. आई-वडील बनण्यासाठी शुभेच्छा देत आहेत. काहींनी तर येणार्‍या मुलांची नावे सुद्धा ठेवली आहेत.

तर काही यूजर्सचे म्हणणे आहे की, जर दोघी एकाच वेळी प्रेग्नंट झाल्या आहेत तर त्यांनाही जुळे मुले होऊ शकतात.