अनेक तज्ज्ञांचा सल्ला – Lockdown तोडगा नाही, कोविडविरूद्ध मास्क हे तसेच हत्यार आहे जसे HIV च्या विरूद्ध ‘कंडोम’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – भारतात कोरोना संसर्गाची प्रकरणे सुमारे 20 दिवसांपासून वेगाने वाढत आहेत. देशात एका दिवसात कोरोनाचे 4 लाखापेक्षा जास्त नवीन रूग्ण सुद्धा सापडले आहेत. यामुळे स्थिती बिघडत चालली आहे. अशावेळी अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, लोकांना सोशल कॉन्टॅक्टपासून रोखण्यापेक्षा हे चांगले आहे की, त्यांना सुरक्षित संपर्काबाबत जागृत केले जावे. प्रसिद्ध वायरोलॉजिस्ट आणि व्हॅक्सीन रिसर्चर डॉक्टर ठेकेकारा जेकब जॉन यांनी एचआयव्हीच्या उदारहणाद्वारे आपले म्हणणे लोकांना आणि सरकार पुढे मांडले आहे.

आऊटलुक इंडियाच्या रिपोर्टनुसार, डॉक्टर जॉन यांनी सांगितले की, एचआयव्ही जेव्हा आला तेव्हा तुम्ही काय करत होतात ? सुरक्षित शरीरीक संबंध ठेवत होतात की, शारीरीक संबंधापासून दूर राहत होतात ? सुरक्षित शारीरीक संबंध म्हणजे कंडोमचा वापर करणे होय. यावरून स्पष्ट आहे की लोकांनी कंडोम निवडला. यासाठी मास्क घालणे एक चांगला तोडगा आहे, लॉकडाऊन नव्हे.

भारतात मागील वर्षी जेव्हा पहिल्यांदा लॉकडाऊन लावला होता, त्यावेळी सुद्धा डॉक्टर जॉन याच्या बाजूने नव्हते. त्यांचे म्हणणे होते की, माणूस सामाजिक प्राणी आहे त्यास दुसर्‍यांशी संपर्क ठेवण्यापासून रोखल्याने मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.

प्रोफेसर वासंतापुरम रवी यांचेही असेच म्हणणे आहे. ते म्हणतात, पूर्णपणे लॉकडाऊन लावणे समस्येवर तोडगा नाही आणि हे पूर्णपणे शक्य सुद्धा नाही. प्रोफेसर रवी सुद्धा वायरोलॉजिस्ट आहेत आणि स्पूतनिक व्ही व्हॅक्सीनच्या अ‍ॅडवायजरी बोर्डात होते.

प्रोफेसर रवी यांच्यानुसार, जबरदस्तीने लोकांचे वर्तन बदलले जाऊ शकत नाही. एचआयव्हीच्या वेळी सुद्धा लोक कंडोम वापरण्यास तयार नव्हते, जसे की आज मास्क घालण्यास तयार नाहीत. नेहमी लोकांना सुरक्षित शारीरीक संबंध ठेवण्याबाबत जागृत करणे हा, शारीरीक संबंध ठेवू नका, असे सांगण्यापेक्षा चांगला पर्याय आहे.

आणखी एक व्हायरस शास्त्रज्ञ प्रोफेसर रामास्वामी पिच्छपन सुद्धा म्हणतात की, लॉकडाऊनचे अनेक नुकसान आहेत. त्यामुळे लॉकडाऊन ऐवजी लोकांना नवीन कोविड वर्तणुकीबाबत सांगितले गेले पाहिजे.