कोरियाकडून ‘चमत्कार’ ! 4 वर्षापुर्वी मृत्यू झालेल्या मुलीची आईसोबत झाली पुन्हा भेट

नवी दिल्ली : वृत्त संस्था – आजकाल सर्वत्र टेक्नॉलॉजी चा बोलबाला सुरू असताना, कोरियाने मात्र या टेक्नॉलॉजी चा वापर करत एक मृत्यू झालेल्या व्यक्तीशी बोलता येते हे सिद्ध करून दाखवले. असाच एक किस्सा कोरियातील टीव्ही शो मध्ये घडला आहे.’ मिटिंग यु ‘ नावाच्या शो मध्ये घडला. एका मुलीचा मृत्यू २०१६ मध्ये झाला होता, तरीही त्या, मुलीच्या आईने तिच्याबरोबर संवाद साधला. या शो मध्ये सात वर्षाच्या मुलीला भेटण्यासाठी आईकडून व्हर्चुअल रियालिटी चा वापर केला गेला.

या कमाल तंत्रज्ञानामुळे आईला चार वर्षांनी आपल्या मृत मुलीशी संवाद साधण्याची संधी मिळाली. सध्या त्या मुलीला कोणताही त्रास नसल्याचे त्या मुलीने सांगितले असून, आई आणि मुलीचा स्पर्श व्हावा म्हणून ऑडिओ आणि सेंसेटिव्ह ग्लोव्ह्ज चा उपयोग केला गेला.

त्या नंतर आईला एका बागेत नेले गेले, आणि तिथे इतक्या वर्षानंतर आपल्या मुलीला बघून आईला अश्रू अनावर झाले होते. तिथे मुलगी आईकडे पाहून हसत होती. तसेच मला तुझी आठवण येते अशी हाक मुलीने आईला दिली.या मुलीचा चेहरा बनवण्यासाठी कोरियातील ‘मुन्व्हा ब्रॉडकॉस्टिंग कॉर्पोरेशन’ कंपनीने प्रचंड मेहनत घेतली.

इतकी मेहनत कि त्या मुलीचा आवाज आणि चेहरा तंतोतंत खरा दिसत होता त्यामुळे आईला खरोखरच मुलगी आपल्या जवळ असल्याचा भास होत होता. मुलीच्या सांगण्यावरून आईने तिचा हात पकडला आणि तिला मिठीत घेण्यासाठी आईचे मन चलबिचल करू लागले. मुलीचा हात पकडताच मुलीच्या वडिलांना , भाऊ -बहीण यांनाही आपले अश्रू रोखून धरता आले नाहीत. मुलीने मी दमले आहे , आता मला झोपायचे आहे असे सांगून सर्वांचा निरोप घेतला. त्यानंतर प्रोग्रॅम चा शेवट करण्यात आला.