Coronavirus : काही दिवसात ‘फुफ्फुसे’ कशी खराब करतो ‘कोरोना’ व्हायरस (व्हिडीओ)

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – एका डॉक्टराने वर्चुअल रिअ‍ॅलिटी व्हिडिओ जारी करत दाखवलं की कोरोना व्हायरस कशाप्रकारे एखाद्या व्यक्तीच्या फुफ्फुसांना खराब करतो. या डॉक्टरांनी अमेरिकेत एका रुग्णालयात उपचार करताना एका व्यक्तीचा 360 डिग्री, 3D फोटो क्लिक केले आहे.

एका वृत्तानुसार, 50 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या एका व्यक्तीला कोरोना झाला होता. काही दिवसात त्यांची प्रकृती गंभीर झाली. जॉर्ज वॉशिंगटन यूनिवर्सिटीमध्ये त्याच्यावर उपचार केले जात आहेत.
डॉक्टरांनी फोटोद्वारे दाखवले की कसे कोरोना व्हायरस पीडित रुग्णाच्या दोन्ही फुफ्फुसांना खराब करतो. कोरोना काही काळात रुग्णाचे फुफ्फुस खराब करतो.

वृत्तानुसार, फोटो घेण्यापूर्वी रुग्णाच्या शरीरात असे कोणतेही लक्षण नव्हते. परंतु अचानक या रुग्णाला श्वास घेण्यास त्रास व्हायला लागला, वेंटिलेटर वर ठेवलेले असताना त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती.

डॉक्टरांनी फोटो जारी करते सांगितले की, रुग्णाच्या फुफ्फुसाच्या फोटोंमध्ये हिरव्या रंगाचा जो काही भाग दिसत आहे त्यावरुन कळते की कोरोनामुळे फुफ्फुस कसे खराब झाले आहे. त्यांनी या फोटोंद्वारे व्हिडिओ तयार केला होता.

सुरुवातीला पीडित रुग्णाला ताप आणि सर्दीचे लक्षण दिसली त्यानंतर पीडित रुग्णाला अन्य एका रुग्णालयात आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले होते. परंतु काही दिवसांनी त्यांची तब्येत आणखी खालावली त्यानंतर रुग्णाला जॉर्ज वॉशिंगटन यूनिवर्सिटीमध्ये दाखल करण्यात आले.