बॉलिवूडचा ‘STUNT MAN’ आणि अजय देवगनचे वडिल विरू देवगन यांचे निधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –अजय देवगनचे वडिल विरू देवगन यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. 85 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. स्टंटमॅन म्हणून विरू देवगन यांना सर्वजण ओळखतात. अ‍ॅक्शन डारेक्टर तसेच दिग्दर्शक आणि निर्माते म्हणूनही वीरू देवगन यांची एक वेगळी ओळख आहे. आज सोमवार(दि 27 मे 2019) त्यांनी जगाचा निरोप घेतला.

वीरू देवगन यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सांतारक्रूजमधील सूर्या रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विलेपार्ले येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या आजारपणामुळे अजयने सिनेमाच्या प्रमोशनच्या काही मुलाखतीही रद्द केल्या होत्या. त्यांच्या पश्चात त्यांची चार मुले आहेत. शिवाय आपली सून काजोल सोबत वीरू देवगन अनेक कार्यक्रमात दिसले आहेत.

मुलगा अजय देवगन आणि बिग बी अमिताभ बच्चन, हिंदुस्तान की कसम या सिनेमाचे दिग्दर्शन आणि निर्मिती वीरू देवगन यांनी केली होती. त्यांच्याबद्दल अधिक सांगायचे झाले तर, त्यांनी 80 हून अधिक सिनेमांसाठी अ‍ॅक्शन डायरेक्टर म्हणून काम केले आहे. लाल बादशाह, इश्क, क्रांती, जान, हकीकत यांसारख्या अनेक सिनेमांसाठी त्यांनी अ‍ॅक्शन म्हणून काम केले आहे. दिल क्या करे या सिनेमाची निर्मिती तसेच क्रांती, सौरभ, सिंहासन यांसारख्या सिनेमातदेखील त्यांनी काम केले आहे.