Viruddha Aahar | ऑटोइम्यून डिसीज-इन्फ्लेमेशन, हे 3 फूड कॉम्बिनेशन शरीरसाठी अतिशय धोकादायक; जाणून घ्या
नवी दिल्ली : Viruddha Aahar | खाण्या-पिण्याशी संबंधीत सवयींचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. काही हेल्दी पदार्थांचे कॉम्बिनेशन आपल्या आरोग्यासाठी अतिशय धोकादायक ठरू शकते. हे पदार्थ एकत्र खाल्ल्याने तुम्ही आजारी पडू शकता. आयुर्वेद चिकित्सक डॉ. दीक्षा भवसार यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेयर केली आहे ज्यामध्ये शरीरासाठी हानिकारक फूड कॉम्बिनेशनबाबत (Viruddha Aahar) सांगितले आहे.
1. दूध आणि मासे (Milk and fish) –
दूध आणि मासे एकदम वेगळ्या गोष्टी आहेत. यामुळे या दोन्ही एकत्र खाणे टाळले पाहिजे. दूध थंड असते, तर माशांची प्रवृत्ती उष्ण असते. या दोन्हीचे कॉम्बिनेशन रक्त आणि बॉडी फंक्शन बिघडवू शकते. एक्सपर्ट सांगतात दूध आणि मीठाच्या कॉम्बिनेशनपासून सुद्धा दूर राहावे. (Viruddha Aahar)
2. दूध आणि फळे (Milk and fruit) –
अनेकजण फळांसोबत दूध पितात, शेक बनवतात. परंतु फळांसोबत दूधाचे कॉम्बिनेशन आरोग्यासाठी नुकसानकारक आहे. एक्सपर्ट सांगतात की, दूध, दही किंवा ताकासोबत कधीही केळे खाऊ नये. दूध आणि केळ्याच्या कॉम्बिनेशनने सर्दी, ताप, खोकला किंवा अॅलर्जी होऊ शकते.
3. तूप आणि मधाची समान मात्रा (The same quantity of ghee and honey) –
तूप आणि मध समान मात्रेत कधीही सेवन करू नये. यामुळे शरीराचे नुकसान होऊ शकते. मधाची प्रवृत्ती उष्ण आणि कोरडी आहे तर तूप थंड मॉश्चरायजिंग क्वालिटीसाठी ओळखले जाते. जर तूप आणि मध मिसळून खाल्ले तर दोन्ही पैकी एकाची मात्रा जास्त असू द्या. (Viruddha Aahar)