‘इबोला’ विषाणूचा शोध घेणारे वैज्ञानिकही ठरले ‘कोरोना’चे बळी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : संपूर्ण जग सध्या कोरोना विषाणूशी झुंज देत आहे. आता या प्राणघातक साथीने इबोला विषाणूच्या शोधामध्ये महत्वाची भूमिका निभावणारे वैज्ञानिक पीटर पियोट यांना देखील शिकार बनवले आहे. पियोट कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसिनचे संचालक पीटर पियोट यापूर्वी कधीही गंभीर आजारी पडले नव्हते. ते म्हणाले की, ‘चाळीस वर्षे अभ्यास करून आणि एचआयव्हीसह इतर संसर्गजन्य रोगांवरील अग्रगण्य संशोधनानंतर अखेर मला देखील एका विषाणूने जखडले.’

2017 मध्ये पियोट यांना आरोग्य विज्ञानातील सेवेसाठी नाईटहूडची मानद पदवी ने सन्मानित करण्यात आले होते. कोरोना संक्रमणानंतर त्यांना न्यूमोनियाचा त्रास झाला होता, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता ते उपचारानंतर या विषाणूपासून बरे होत आहेत. पियोटने आशा व्यक्त केली की या संकटाच्या काळात देशांमधील राजकीय तणाव कमी होईल आणि यामुळे तज्ञ लसीचा शोध घेण्यास प्रवृत्त होतील. ते म्हणाले की, आता या साथीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेचे नेतृत्वही सुधारले जाऊ शकते.

कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर पहिल्या मुलाखतीत प्राध्यापक पियोट यांनी वैयक्तिक अनुभव शेअर केले. ते म्हणाले की या साथीमुळे लोकांच्या आरोग्यावर विषाणूच्या संभाव्य प्रभावाबाबत चर्चा होईल. मूत्रपिंड आणि हृदयाच्या समस्यांपासून लोक वाचतील.