अमेरिकेचा पाकिस्तानवर राजकीय बॉम्ब : व्हीसाची मर्यादा ५ वर्षांवरून तीन महिन्यांवर

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था – अमेरिकेने पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना मदत करण्याच्या भुमिकेविरोधात कडक पाऊले उचलण्याचे ठरविले आहे. अमेरिकेने पाकिस्तानच्या नागरिकांना मिळणाऱ्या व्हिसाच्या मुदतीमध्ये कमालीची कपात केली असून पाकिस्तानी नागरिकांना आता तीन महिन्यांपेक्षा जास्त काळासाठी व्हीसा देण्यात येणार नाही हे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. याआधी ही मुदत ५ वर्षे होती. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे.

दहशतवाद्यांना संरक्षण देण्याचे कृत्य पाकिस्तानच्या चांगलेच अंगलट आले आहे. ‘अमेरिकेने व्हिसाच्या धोरणात बदल करत पाकिस्तानी नागरिकांना पाच ऐवजी केवळ १२ महिन्यांचा व्हिसा मिळणार आहे. तर पत्रकारांना परवाना नुतनीकरण केल्याखेरीज तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ अमेरिकेत राहता येणार नाही. तसेच अमेरिकेमध्ये नोकरी, पत्रकारीता, बदली, धार्मिक कारणासाठी वेगवेगळे व्हिसा देण्यात येतात. या व्हिसासाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्कामध्येही कमालीची वाढ केली आहे. आता व्हिसासाठी जादाची ३२ ते ३८ डॉलरची रक्कम मोजावी लागणार आहे. अमेरिकेच्या उच्चायुक्तांलयाच्या प्रवक्यांनी याबाबत माहिती दिली आहे.

अमेरिकेचा पाकिस्तानला झटका –

पुलवामा हल्ल्यानंतर भारताला दहशतवादाविरुद्ध कारवाईसाठी देखील अमेरिकेने पाठिंबा दिला होता. भारताने जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर केलेल्या एअर स्ट्राईकचे देखील अमेरिकेने समर्थन केले होते. तसेच एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानने अमेरिकन बनावटीच्या एफ-१६ चा चुकीच्या पद्धतीने वापर केल्यामुळे अमेरिकेने पाकिस्तानला खडे बोल सुनावले होते.

अमेरिकेतील नागरिकांना रोजगार मिळावा यासाठी ट्रम्प प्रशासनाने एच१ बी१ या व्हिसा प्रकारावर प्रतिबंध आणण्याचे ठरविले होते. मात्र, देशातील कंपन्यांकडून विरोध झाल्याने हा प्रस्ताव बारगळला होता.