Indian Idol : विशाल ददलानीनं लता मंगेशकरांच्या ‘त्या’ गाण्याबद्दल दिली चुकीची माहिती ! ट्रोल झाल्यानंतर मागितली माफी (व्हिडीओ)

पोलिसनामा ऑनलाईन – इंडियन आयडल (Indian Idol) चा जज, फेमस सिंगर विशाल ददलानी (Vishal Dadlani) यानं दिग्गज गायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या फेमस देशभक्तीपर गीत ऐ मेरे वतन के लोगो बद्दल चुकीची माहिती दिली. यानंतर माजी परराष्ट्र मंत्री दिवंगत सुषमा स्वराज यांचे पती स्वराज कौशल यांनी ट्विटरवरून त्याचा समाचार घेतला. सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर विशालनं आपली चूक मान्य केली आणि माफीही मागितली.

इंडियन आयडलच्या रविवारच्या एपिसोडमध्ये एका स्पर्धकानं ऐ मेरे वतन के लोगो गाणं गायलं. स्पर्धकाच्या सादरीकरणानंतर विशाल म्हणाला, हे गाणं लता मंगेशकर यांनी 1947 मध्ये देशाचे पहिले पंतप्रधान पीएम जवाहरलाल नेहरू यांच्यासाठी गायलं होतं. आजही हे गाणं सर्वांच्या मनात आहे.

विशालच्या या वक्तव्यानंतर स्वराज कौशल यांनी ट्विट करत लिहिलं की, हे आहेत म्युझिक डायरेक्टर विशाल ददलानी. भारतरत्न आणि दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित दोन लोकांबद्दल चुकीची माहिती दिली आहे.

https://twitter.com/governorswaraj/status/1353397357744939008?s=20

https://twitter.com/governorswaraj/status/1353409652361461763?s=20

त्यांनी आणखी एका ट्विट मध्ये लिहिलं की, लताजींचा जन्म 1929 साली झाला होता. 1947 साली त्या अवघ्या 17 वर्षांच्या होत्या. लताजींनी हे गाणं 26 जानेवारी 1963 साली दिल्लीत गायलं होतं. कवी प्रदीप यांनी हे गाणं लिहिलं होतं. गाणं ऐकल्यानंतर जवाहरलाल नेहरू म्हणाले होते की, मुली तु्झ्या गाण्यानं मला रडवलं.

सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर विशालनं ट्विट करत लिहिलं की, ऐ मेरे वतन के लोगो या गाण्याबद्दल मी दिलेल्या चुकीच्या माहितीमुळं नाराज झालेल्या लोकांची मी माफी मागतो. परंतु या कट्टर राष्ट्रवादींनी तेव्हा काहीच नाही केलं जेव्हा #Chornab पुलवामातील भारतीय जवानांच्या मृत्यूला टीआरपी विजयाच्या रूपात साजरे करत होते. सोशल मीडियावर या दोघांचेही ट्विट व्हायरल होताना दिसत आहेत.