‘तिरस्काराचा पराजय, मेहनत आणि सत्याचा विजय’, ‘गायक’ विशाल ददलानीच्या AAP ला शुभेच्छा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी झालेल्या मतदानाचा निकाल जवळपास समोर आला आहे. समोर आलेल्या आकड्यांवरून हे स्पष्ट झालं आहे की, यावर्षीही दिल्लीत आम आदमी पार्टी आपलं सरकार स्थापन करणार आहे. या निकालानंतर आपचे समर्थ जल्लोष करताना दिसत आहेत. अशातच बॉलिवूड म्युझिक डायरेक्टर विशाल ददलानी यानं ट्विट करत आम आदमी पार्टी आणि कार्यकर्त्यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. विशलानं निकाल समोर येण्याआधी सकाळीही ट्विट केलं आहे. निकाल स्पष्ट झाल्यानंतर भेटू असं त्यानं म्हटलं होतं.

दिल्ली निकाल स्पष्ट झाल्यानंतर ट्विट करत विशाल म्हणतो, “तिरस्काराचा पराजय, मेहनत आणि सत्याचा विजय. ऐकत तर आहोत परंतु दिल्लीनं सलग तिसऱ्यांदा सिद्ध केलं आहे. जय हिंद माझ्या मित्रांनो. अमर्यादित प्रेम आणि खूप खूप धन्यवाद. माझं तुम्हा सर्वांना आलिंगन”

आणखी ट्विटमध्ये विशालनं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचं कौतुक करत म्हटलं आहे की, “हे अरविंद केजरीवाल भाई आयटीआयची सवय सोडायला तयार नाही. इथेही 90 %. हद्दच झाली राव. सर्वांना शुभेच्छा. आजचा दिवस खूप शानदार आहे.”

सकाळी केलेल्या ट्विटमध्ये विशाल ददलानीनं आपचं समर्थन केलं होतं. आपल्या ट्विटमध्ये विशाल म्हणाला होता, “हरलो तर मेहनत करू. जिंकलो तर आणखी मेहनत करू. मी निकाल नाही पाहू शकत. खूपच तणावपूर्ण वाटत आहे. निकालानंतर मी पुन्हा भेटतो. मला आशा आहे की, जे देशासाठी चांगलं आहे तेच पहायला मिळेल. मला आम आदमी पक्षाच्या बंधु आणि भगिनींना सांगू इच्छितो की, आज जर आपण जिंकलो तर तुम्ही नम्र रहा. जमीनीला जोडून रहा. जय हिंद”