लग्नसमारंभावेळी गोळीबार केलेल्या विशाल खेडेकरला पुणे पोलिसांकडून अटक

तासगाव: पोलीसनामा आॅनलाइन

मांजर्डे (ता.तासगाव) येथे शुक्रवारी दि.22 रोजी रात्री लग्नसमारंभावेळी झालेल्या गोळीबाराच्या घटनेबाबत रविवार दि.24 रोजी विशाल खेडेकर (गाव-आरवडे,ता.तासगाव) व अन्य अनोळखी एक यांच्या विरोधात तासगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी विशाल खेडेकर यास रविवारी पुणे येथील देहू रोड पोलिसांनी अटक केली असून इतर संशयितांचा शोध सुरू आहे. तासगाव पोलिसांनी यास दुजोरा दिला आहे.

मांजर्डे येथे शुक्रवारी दि.22 जून रोजी रात्री 11 च्या दरम्यान गावदेवाच्या वेळी दोघांनी गोळीबार केल्या प्रकरणी तासगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत तासगाव पोलीस पुणे पोलिसांच्या सतत संपर्कात होते. पुणे पोलिसांत अन्य दोन गुन्हेही दाखल आहेत.

[amazon_link asins=’B07CVJYK5D’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b95a1f0a-7e04-11e8-a06c-7db71a6c1624′]

याबाबत सविस्तर माहिती अशी, की विशाल खेडेकर व एक अनोळखी  शुक्रवारी रात्री मांजर्डे येथील अशोक मोहिते यांच्या घराजवळ आले व त्यांनी बेंजोचे साहित्य गोळा करतेवेळी  प्रवीण जाधव यांच्या कानपट्टीस पिस्तूल लावले आहे. ते पाहण्यासीठी मोहिते व त्यांचे सहकारी गेले असता त्यांना दोन अनोळखी माणसे दिसली. त्यांना तुम्ही कोण आहात, ईथे का थांबले आहात असे विचारताच त्यांनी मोहिते यांना शिवीगाळ व लाथांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यापैकी एकाने अशोक मोहिते यांच्या दिशेने गोळीबारही केला, ती गोळी मोहिते यांच्या दोन पायांच्या मध्ये जमिनीत घुसली, व दुसऱ्या एकाने हवेत गोळीबार केला. व त्यानंतर दोघेही लाल रंगाच्या पल्सर वरुन आरवडेच्या दिशेने निघून गेले. त्यानंतर गावातील तरुणांनी त्यांचा पाठलागही केला मात्र ते सापडले नाही. लाल रंगाची पल्सर आरवडे येथेच टाकून ते पळून गेले. याबाबतची तक्रार अशोक मोहिते यांनी तासगाव पोलिसात दिली होती.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like