सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – Vishal Patil | लोकसभा निवडणुकीच्या (Sangli Lok Sabha) जागावाटपाच्या दरम्यान सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत फूट पडेल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. याठिकाणी उद्धव ठाकरे यांनी आपला उमेदवार दिलेला होता.(Vishal Patil)
दरम्यान त्याठिकाणी विशाल पाटील यांनी अपक्ष फॉर्म भरत ही लढत आणखी चर्चेची केली. याठिकाणी अपक्ष आमदार विशाल पाटील १ लाखांच्या मताधिक्यांनी निवडून आले. आता त्याच विशाल पाटलांनी विश्वजित कदमांसोबत दिल्लीत जात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे पाठिंबा पत्र दिले आहे.
मल्लिकार्जुन खरगे यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले की,” महाराष्ट्रात अहंकारी राजकारणाला
जनतेने पराभूत केले. सामाजिक न्याय, समता आणि स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले
आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या आपल्या प्रेरणादायी दिग्गजांना ही योग्य श्रद्धांजली आहे”.
सांगलीतील खासदार विशाल पाटील यांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्याचे त्यांनी सांगितले. विशाल पाटलांच्या या पाठिंब्यामुळे देशात काँग्रेस खासदारांनी शतक गाठल्याचे दिसून येते.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा