Vishal Phate Scam | ‘बिगबुल’च्या टी-शर्टमध्ये विशाल फटे शरण, 81 जणांनी केल्या तक्रारी

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – सोलापूर जिल्ह्यातील (Solapur District) बार्शी तालुक्यासह (Barshi Taluka) राज्यात सध्या विशाल फटे (Vishal Phate Scam) नावाची चर्चा सुरु आहे. विशाल फटे याने बार्शी आणि सोलापूर जिल्ह्यातील अनेकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक (Fraud) केली आहे. शेअर मार्केटच्या गुंतवणुकीत (Stock Market Investment) महिना 5 ते 25 टक्के रिटर्न्स मिळवून देण्याचे आमिष (Lure) विशाल फटे (Vishal Phate Scam) याने दाखवले होते. विशालका कन्सल्टींग सर्व्हीसेसचा संचालक (Director of Vishalka Consulting Services) असलेला विशाल फटे हा सोमवारी (दि.17) सायंकाळी 6.30 ते 7 दरम्यान थेट पोलीस अधीक्षक कार्यालयात (SP Office) हजर झाला. पोलिसांनी त्याला अटक (Arrest) केली असून आज त्याला बार्शी येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात (Additional District Sessions Court) हजर केले जाणार आहे.

 

बार्शीसह जिल्ह्यातील अनेक गुंतवणूकदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणारा विशाल फटे (Vishal Phate Scam) याच्या विरोधात चौथ्या दिवशी 5 जणांनी 25 लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत.
बार्शी पोलिसात (Barshi Police) आजपर्यंत 81 तक्रारांकडून 18 कोटी 78 लाख 17 हजारांची फसवणूक झाल्याची नोंद केली आहे.
गुंतवणूकदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्यासह 5 जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा (FIR) दाखल झाल्यानंतर दोघांना अटक झाली आहे.

याप्रकरणात प्रमुख असलेल्या विशाल फटे (रा. उपळाई रोड) याने अनेक गुंतवणूकदारांना पैशाचे आमिष दाखवून गुंतवणूक करणाऱ्यांना प्रथम व्याजासह रक्कम देऊन विश्वास संपादन केला.
त्यामुळे गुंतवणूकदारांचा ओढा वाढताच तो बार्शीतून पसार झाला होता.
त्यामुळे त्याच्याविरुद्ध 14 जानेवारी रोजी बार्शी पोलीस ठाण्यात (Barshi Police Station) तक्रारी अर्ज दिल्याने पहिल्या दिवशी 5 जणांनी दिलेल्या अर्जावरुन 5 कोटी 63 लाखांची फसवणूक केल्याचा पहिला गुन्हा दाखल झाला होता.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी तक्रारी अर्जात वाढ होऊन 11 कोटी 7 लाख 35 हजार रुपयांची झाली.
आजपर्यंत 81 जणांनी 18 कोटी 78 लाख 17 हजार रुपयांची फसवणूक झाल्याबद्दल अर्ज दाखल केले आहेत.

 

Web Title :- Vishal Phate Scam scammer vishal phate big bulls t shirt surrender police official complaint 81 people barshi solapur crime news

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा