Vishal Reddy | अभिनेता विशाल कृष्ण रेड्डीने ट्विटरवर शेअर केला अपघाताचा व्हिडीओ; थोडक्यात वाचला जीव
पोलीसनामा ऑनलाइन : Vishal Reddy | तमिळ अभिनेता आणि निर्माता विशाल कृष्ण रेड्डी हा अपघातातून वाचला आहे. चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सेटवरच हा अपघात झाला. या अपघातातून तो मरता मरता वाचला आहे. त्याचा आगामी चित्रपट ‘मार्क एंटनी’ शूटिंग दरम्यान ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ स्वतः त्यांनी शेअर करत या धक्कादायक प्रसंगाची माहिती दिली आहे. त्याने शेअर केलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. (Vishal Reddy)
विशालने त्याच्या ट्विटर अकाउंट वरून मार्क एंटनी चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचा तो व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की कशा पद्धतीने ट्रकचा ताबा सुटला आणि ट्रक भरधाव वेगाने पुढे आला. सुदैवाने मोठा अपघात होता होता राहिला. हा व्हिडिओ शेअर करत विशालने लिहिले “काही सेकंद आणि काही इंचाने देवाने माझा जीव वाचवला. देवाचे खूप खूप आभार. मी या घटनेनंतर स्तब्ध झालो आणि आता पुन्हा स्वतःच्या पायावर शूटिंग सेटवर परतलो आहे”. (Vishal Reddy)
Jus missed my life in a matter of few seconds and few inches, Thanks to the Almighty
Numb to this incident back on my feet and back to shoot, GB pic.twitter.com/bL7sbc9dOu
— Vishal (@VishalKOfficial) February 22, 2023
या व्हिडिओमध्ये दिसत आहे की चित्रपटाचा शूटिंग चालू आहे आणि सेटवर क्रू मेंबर देखील उपस्थित आहेत.
यावेळी फाईटचा सिक्वेन्स चालू होता ज्यामध्ये ट्रक भिंत तोडून बाहेर पडल्यानंतर थांबणे अपेक्षित होते मात्र असे
न होता ट्रकचा ताबा सुटला आणि तो वेगाने त्याच दिशेने पुढे आला ज्या दिशेने विशाल उभा होता.
अचानक ट्रकवरील ताबा सुटल्याने सेटवर एकच गोंधळ उडाला. सध्या विशालचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होताना दिसत आहे.
Web Title :- Vishal Reddy | south actor vishal krishna reddy accident on film set video goes viral
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Aurangabad Crime News | धक्कादायक ! आर्थिक विवंचनेतून शेतकरी दाम्पत्याने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल