युवकाची धावत्या ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या; सुसाइड नोटमध्ये महिला IPS अधिकाऱ्यावर केले ‘गंभीर’ आरोप

लखनऊ : वृत्तसंस्था –  उत्तरप्रदेश राज्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लखनऊ येथील एका युवकाने धावत्या ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. विशाल सैनी असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून, आत्महत्यापूर्वी त्याने लिहलेली सुसाइड नोट पोलिसांना मिळाली आहे. त्या सुसाइड नोटमध्ये एका महिला पोलीस अधिकाऱ्यांनी छळ केला आहे. तसेच, केसमध्ये अडकवून तुरूंगात पाठवण्याचा आरोप त्या युवकाने IPS अधिकारी प्राची सिंह यांच्यावर केल्याचे उघड झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, हसनगंजच्या विवेकानंद हॉस्पिटल रेल्वे क्रॉसिंगच्याजवळ विशाल सैनी याने पोलिसांना फोन करून त्यानंतर त्याने धावत्या ट्रेनसमोर उडी मारली. विशाल हा सचिवालयात कॅम्युटर ऑपरेटर म्हणून काम करत होता. तर त्याने आपल्या सुसाइड नोटमध्ये नॉर्थ झोनमध्ये तैनात IPS अधिकारी प्राची सिंह यांच्यावर केलेलं आरोप म्हणजे मी आत्महत्या करीत आहे, यासाठी जबाबदार IPS प्राची सिंह आहेत, त्यांनी माझे करिअर खराब केले आहे आणि मी समाजात आणि कुटुंबीयांच्या नजरेसमोर उभा राहू शकत नाही. त्याचा मला त्रास होत आहे. तसेच IPS प्राची सिंह यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला, बढतीच्यावेळी अनेक निरपराध लोकांना शिक्षा केली, मी निर्दोष होतो, माझी प्राची सिंह यांनी सेक्स रॅकेटमध्ये फसवणूक केली आहे, असे त्या सुसाइड नोटमध्ये त्याने सांगितले आहे.

दरम्यान, १३ फेब्रुवारी रोजी IPS प्राची सिंह यांनी इंदिरा नगरमध्ये स्टाइल इन दी ब्युटी सलून आणि स्पा सेंटरवर छापा टाकला होता. त्यावेळी पाच महिलांना अटक केले होते. त्यांच्याबरोबर मृत युवक विशाल यालाही अटक केली होती. परंतु जेलमधून सुटल्यानंतर त्याला मानसिक त्रास होऊ लागला आहे असे सांगण्यात आले. तसेच या घटनेवरून त्या युवकांकडून करण्यात आलेले आरोप हे निराधार आहे. तसेच संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरु असल्याचं पोलीस आयुक्त डीके ठाकूर सांगितलं आहे.